‘त्या’ बिबट्याला जीवदान...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

गुहागर -  तालुक्‍यातील जामसूद-तांबटवाडी येथील शांताराम हुमणे यांच्या विहिरीत पडलेला बिबट्याला वन खात्याने पिंजरा टाकून रात्री सव्वानऊच्या सुमारास बाहेर काढला. १८ डिसेंबरला सायंकाळी साडेचारच्या सुमारास जामसूद येथील शांताराम हुमणे यांचे बागेत पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू होते. या वेळी विहिरीत पाणी बघण्यासाठी तेथील काम करणारा मुलगा गेला असता त्याला विहिरीत बिबट्या दिसला. त्याने शांताराम हुमणे यांना आणि हुमणे यांनी सभापती विलास वाघे यांना याची माहिती दिली. सभापती वाघे यांनी गुहागर पोलिसांना कळवले. पोलिसांनी वन विभागाला कळवून पोलिस निरीक्षक प्रदीप मिसर घटनास्थळी गेले.

गुहागर -  तालुक्‍यातील जामसूद-तांबटवाडी येथील शांताराम हुमणे यांच्या विहिरीत पडलेला बिबट्याला वन खात्याने पिंजरा टाकून रात्री सव्वानऊच्या सुमारास बाहेर काढला. १८ डिसेंबरला सायंकाळी साडेचारच्या सुमारास जामसूद येथील शांताराम हुमणे यांचे बागेत पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू होते. या वेळी विहिरीत पाणी बघण्यासाठी तेथील काम करणारा मुलगा गेला असता त्याला विहिरीत बिबट्या दिसला. त्याने शांताराम हुमणे यांना आणि हुमणे यांनी सभापती विलास वाघे यांना याची माहिती दिली. सभापती वाघे यांनी गुहागर पोलिसांना कळवले. पोलिसांनी वन विभागाला कळवून पोलिस निरीक्षक प्रदीप मिसर घटनास्थळी गेले. वनविभागाचे मिलिंद डाफळे व त्यांचे कार्यालयीन सहकारी पिंजरा घेऊन घटनास्थळी गेले व विहिरीत पिंजरा टाकून बिबट्याला काढले. वन विभागाने त्याला सुरक्षित वनक्षेत्रात सोडले आहे.

Web Title: Took it out to the Leopard