वेंगुर्लेत कासवांसह चंदनसाठा जप्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

वेंगुर्ले - वन विभागाच्या पथकाने शहरातील कॅम्प, म्हाडा कॉलनी व कातकरी वस्तीत छापा टाकून चंदन लाकडासहित जिवंत व मृत कासव असे मिळून तीन लाख 28 हजार 408 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला व सात जणांना अटक केली. ही कारवाई आज दुपारी करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, वनक्षेत्रपाल फिरत्या पथकाने (सावंतवाडी) कॅम्प, म्हाडा कॉलनी येथील अजित गावडे यांच्या घरी छापा टाकला. त्यात 17.554 किलोग्रॅम चंदन; तसेच 6.705 किलो ग्रॅम चंदनाची साल असा 40 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. वेंगुर्ले कॅम्प येथे वास्तव्यास असलेल्या कातकरी समाजाच्या सहा झोपड्या, तर एक चिरेबंदी घराची झडती घेण्यात आली. यातून 7.414 किलो ग्रॅम चंदन साल, नऊ जिवंत कासवे, 75 मृत कासवांचे अवशेष, शिकारीसाठी वापरलेले दोन तिरकमटे, बाण, कोयता असे मिळून दोन लाख 88 हजार 408 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी येथील अजित गणपत गावडे, मयूर विजय आंगचेकर, गणेश अनंत गिरी, सुरेश जयराम पवार, चंदू जयराम पवार, शिवाजी तुकाराम पवार, राजू अर्जुन पवार यांना अटक करण्यात आली.

Web Title: Tortoise and sandle seized crime