कळवंडे ग्रामपंचायतीत बिनविरोध निवडणूकीची परंपरा कायम 

Tradition of unopposed elections continues in Kalwande Gram Panchayat
Tradition of unopposed elections continues in Kalwande Gram Panchayat

चिपळूण ( रत्नागिरी ) - तालुक्‍यात कृषी क्षेत्रात अग्रेसर असलेल्या कळवंडे गावात ग्रामपंचायतीसाठी कधीही निवडणूक झालेली नाही. कळवंडे ग्रामपंचायत स्थापनेपासून बिनविरोध होत आहे. यावर्षी काहीशी निवडणुका होण्याची चिन्हे होती; मात्र गावच्या प्रमुख लोकांनी इच्छुकांची समजूत काढली. त्यामुळेच कळवंडे गावाने 1960 च्या स्थापनेपासून बिनविरोधची परंपरा याही वेळेस कायम जपल्याचे दिसून आले आहे. 

विविध भाजीपाला पिकांसह व्यावसायिक पिके घेण्यात अग्रेसर असलेलं कळवंडे गाव. या गावाने एकीच्या जोरावर अनेक पुरस्कार आणि बक्षिसे मिळवली आहेत. राजकीय पक्षांचे फलक गावात न लावणे, शेती पिकासह गावात कसलीही चोरी न करणे, प्रत्येकाने वृक्ष लागवड करणे, दारूबंदी, वणवाबंदी आदी विविध विधायक उपक्रम गेल्या अनेक वर्षापासूनच या गावात राबवले जात आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीवरून भावकीत कंदाल होऊ नये, राजकारणातून गावचा विकास थांबू नये यासाठी ग्रामपंचायतीची निवडणूक नियमितपणे बिनविरोध होत आहे. ग्रामपंचायतीच्या 1960 च्या स्थापनेपासून आजतागायत ग्रामपंचायतीची निवडणूक झालेली नाही. गावातील प्रत्येक वाडीला सरपंचपदाची संधी दिली जाते. सरपंचपदाचे रोटेशन ठरलेले आहे. त्यामुळे सरपंचपदावरून कधी वाद होत नाही. प्रत्येक वाडी ग्रामस्थांची बैठक घेत चर्चा करते. त्यानंतर एकमताने उमेदवार दिला जातो. 

माजी सरपंच व गावचे प्रणेते (कै.) बाळाराम उर्फ तात्या उदेग यांनी गावाला एक स्वतंत्र दिशा दाखवून दिली. ते अनेक वर्षे सरपंच होते. त्यांनी घालून दिलेल्या विविध नियमांमुळेच गावातील शेतकऱ्यांची चांगली प्रगती झाली. त्यांचा वारसा प्रगतशील शेतकरी व उद्योजक वसंत उदेग चालवत आहेत. या वेळेच्या निवडणुकीत गावात इच्छुकांची संख्या अधिक होती. सरपंचपदासाठीदेखील घासाघीस सुरू होती; मात्र वसंत उदेग व प्रमुख ग्रामस्थांनी चर्चेने त्यावर मार्ग काढला. त्यामुळेच ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होऊन 9 सदस्य विजयी झाले आहेत. 


ग्रामपंचायत निवडणुकीवरून घराघरांत वाद निर्माण होऊ नयेत, यासाठी गावाने बिनविरोध ग्रामपंचायत निवडणुकीची भूमिका स्वीकारली आहे. गावातील सर्व ग्रामस्थांचे या कामी सहकार्य मिळते. यामुळेच गावच्या विकासाला चालना मिळण्यास मदत होत आहे. 
- वसंत उदेग, कळवंडे गावचे मार्गदर्शक 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com