पुर ओसरला; तळेरे - कोल्हापूर मार्गावर वाहतूक सुरू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

वैभववाडी - मांडुकली (ता. गगनबावडा) येथे रस्त्यावर आलेले पुराचे पाणी ओसरल्यामुळे तळेरे - कोल्हापूर मार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे. ऱविवारी (ता. ८) सकाळपासून हा मार्ग वाहतूकीस बंद करण्यात आला होता.

वैभववाडी - मांडुकली (ता. गगनबावडा) येथे रस्त्यावर आलेले पुराचे पाणी ओसरल्यामुळे तळेरे - कोल्हापूर मार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे. ऱविवारी (ता. ८) सकाळपासून हा मार्ग वाहतूकीस बंद करण्यात आला होता.

कोल्हापूर जिल्हयात सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि धरणातून होणारा विसर्ग यामुळे कोल्हापूरात पुरस्थिती निर्माण झाली आहे. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे गगनबावडा-कोल्हापूर मार्गावरील मांडुकली काल सकाळी रस्त्यावर पुराचे पाणी आले होते. त्यामुळे तळेरे-कोल्हापुर मार्गावरील वाहतुक प्रशासनाने बंद केली होती. मांडुकलीत जावून शेकडो वाहनांना माघारी परतावे लागले होते. या मार्गावरील वाहतूक फोंडाघाटमार्गे वळविण्यात आली होती.

दरम्यान, साेमवार (ता. ९) पहाटे पाच वाजता मांडुकली येथील रस्त्यावर आलेले पाणी पुर्णपणे. ओसरले आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. तशा प्रकारचा संदेश गगनबावडा पोलिसांनी वैभववाडी पोलिसांना दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic begins on Talere Kolhapur road