इन्सुली नाक्‍यावर वाहतूक कोंडी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

बांदा - मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली तपासणी नाका येथे गाड्यांची कसून तपासणी सुरू आहे; मात्र या तपासणी नाक्‍यावर फक्त दोनच कर्मचारी असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत  असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी पर्यटकांना याचा नाहक त्रास होत असल्याने पर्यटकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याच  प्रकारची बेकायदा वाहतूक होता कामा नये यासाठी सिंधुदुर्ग पोलिस अलर्ट असल्याचे या तपासणी नाक्‍यावरील तपासणीवरून लक्षात येते.

मुंबई-गोवा महामार्गवरील इन्सुली येथे बांदा पोलिसांचा तपासणी नाका आहे. जिल्हा परिषद व पंचायत  समितीच्या पार्श्‍वभूमीवर या तपासणी नाक्‍यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची तपासणी गेले काही दिवस सुरू आहे. काही दिवसांपूर्वी या ठिकाणीच्या कर्मचाऱ्यांना शंभर रुपयांची लाच घेत असताना उपविभागीय पोलिस अधिकारी दयानंद गवस यांनी रंगेहाथ पकडले होते. मात्र चार कर्मचाऱ्यांच्या ऐवजी या ठिकाणी दोनच कर्मचारी असल्याने तपासणीस वेळ लागत असून वाहतूक कोंडी होत आहे.

सध्या निवडणुकीची धामधूम असल्याने गोवा व महाराष्ट्र सीमेवरील इन्सुली तपासणी नाक्‍यावरून अवैध वाहतूक होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. गोवा बनावटीच्या दारूचा वापर सिंधुदुर्गासह इतर ठिकाणी होत असतो. त्याला निर्बंध घालण्याचे आव्हान याच तपासणी नाक्‍यावरील कर्मचाऱ्यांना असते; मात्र या ठिकाणी दोनच कर्मचारी असल्याने वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात विनाकारण त्रास सहन करावा लागतो.

Web Title: Traffic jams on insuli naka