काळ आला होता; पण... 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

पहाटेच्या वेळी झोप आल्याने त्यांनी मोटार (एमएच 10 सी एन 680) ही मुंबई-गोवा महामार्गावरील ओरोस येथील रवळनाथ मंदिरासमोर रस्त्यालगत थांबवली होती. पहाटे साडेपाचच्या सुमारास बोरिवली ते गोवा येथे जाणाऱ्या बसची (एमएच 47 वाय 8184) त्यांच्या गाडीला जोरदार धडक बसली.

ओरोस ( सिंधुदुर्ग ) - येथे मुंबई - गोवा महामार्गालगत रवळनाथ मंदिरानजीक रस्त्याकडेला उभ्या असलेल्या मोटारीला आराम बसची धडक बसून अपघात झाला. आज पहाटे ही घटना घडली.

दैव बलवत्तर म्हणून विश्रांती घेणाऱ्या मोटारीतील कोणालाही इजा झाली नाही. त्यामुळे काळ आला होता; पण वेळ आली नव्हती, याची प्रचीतीच प्रवाशांना आली. या प्रकरणी बसचालक राहुल माणिकराव मस्के (वय 28, रा. मुंबई) याच्यावर सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

पाहा दिपोत्सवाने उजळलेले कुणकेश्वरचे मंदीर (व्हिडिओ) 

सावंतवाडी येथील मित्र राहुल रणदिवे यांच्या आईचे निधन झाल्याने त्यांना भेटण्यासाठी सांगली-मिरज येथील विनायक मगदूम व त्यांचे अन्य पाच ते सहा सहकारी मित्र सावंतवाडीकडे निघाले होते. 29 रोजी रात्री जेवण आटोपून ते मिरज येथून सावंतवाडीकडे निघाले. पहाटेच्या वेळी झोप आल्याने त्यांनी मोटार (एमएच 10 सी एन 680) ही मुंबई-गोवा महामार्गावरील ओरोस येथील रवळनाथ मंदिरासमोर रस्त्यालगत थांबवली होती. पहाटे साडेपाचच्या सुमारास बोरिवली ते गोवा येथे जाणाऱ्या बसची (एमएच 47 वाय 8184) त्यांच्या गाडीला जोरदार धडक बसली. या धडकेत मोटारीचा चक्काचूर झाला.

रत्नागिरी : नाणीजमध्ये उद्या नरेंद्राचार्य महाराज जन्मोत्सव 

केवळ दैव बलवत्तर म्हणून विश्रांती घेत असलेल्या आतील कोणालाही इजा पोचली नाही; मात्र मोटारीचे तसेच आराम बसचे नुकसान झाले. याप्रकरणी ओमनी चालक विनायक मगदूम यांच्या फिर्यादीनुसार आराम बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक रवी जाधव करीत आहेत. 

पत्नी माहेरी गेल्याच्या रागातून मेव्हणी, सासऱ्यावर चाकूने वार 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traveler Bus and Motor Accident Near Oros