मुंबई गोवा महामार्गावर धूळीने प्रवासी त्रस्त

highway faces dust issues
highway faces dust issues

पाली : मुंबई गोवा महामार्गावरील अपूर्ण आणि खराब काम, खड्डे आणि धूळ यामुळे प्रवाशी पुरते हैराण झाले आहेत. महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी माती आणि खडीचा वापर केला होता. सद्यस्थितीत पाऊस थांबून ऊन पडत आहे. त्यामुळे वाहने जावून खड्डयांतून धूळ बाहेर उडत आहे. याचा त्रास वाहन चालक, दुचाकिस्वार आणि प्रवाश्यांना होत आहे. तसेच महामार्गाशेजारील दुकानदार, हॉटेल व्यवसायीक व रहिवाशी देखील त्रस्त झाले आहेत.

मुंबई गोवा महामार्गावर खड्डयांनी, चिखलाने आणि आता खड्यांबरोबरच धुळीने प्रवासी व चालकांना हैराण केले आहे. या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरु आहे. महामार्गावर ठिकठिकानी खड्डे बुजविण्यासाठी त्यामध्ये खडी आणि मातीची तात्पुरती मलमपट्टी केली आहे. आता मात्र वाहने जावून खड्डयांतील माती आणि खडी बाहेर येवून मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. हि धूळ वाहन चालक, दुचाकीस्वार प्रवाश्यांच्या नाकातोंडात जावून त्याचा त्यांना खुप त्रास होत आहे.

श्वसनाचे विकार असलेल्यासह, लहान मुले व वृद्ध यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. या महामार्गावरील डायव्हर्जन जवळ देखील हिच परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी बाजूपट्टी वरील माती देखील रस्त्यावर येत आहे. त्यामुळे धुळीचा त्रास अधिक जाणवत आहे.

महामार्गावरील हि धुळ इतक्या मोठ्या प्रमाणत उडते कि बऱ्याचदा समोरुन येणारे वाहन देखिल दिसत नाही. त्यामुळे अपघात होण्याचा धोका आहे. हा धुरळा वाहन चालक आणि प्रवाश्यांच्या अंगावर सर्वत्र बसतो. नुकत्याच येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवात तर भाविकांचे पुरते हाल होणार आहेत.

अवजड व मोठी वाहने डोकेदुखी
महामार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड व मोठ्या वाहनांची वाहतूक चालते. या वाहनांची चाके अधिक मोठी असतात. त्यामुळे खड्डे आणि खराब रस्त्यावर गेल्यास खुप धुरळा उडतो. हि सर्व अवजड वाहने कुठूनही एकाच वेळी एका पाठोपाठ एक निघतात. परिणामी या वाहनांच्या पाठीमागे तसच शेजारून जाणाऱ्या छोट्या वाहनांना आणि दुचाकीस्वारांना प्रचंड त्रास होतो. 

"कामानिमित्त या महामार्गावरुन नियमित प्रवास करतो. रस्त्यावरील आणि खड्यांमधील माती उडून ती नाकातोंडात जाते. याचा खुप त्रास होतोे. यामुळे त्वचेचे व श्वसनाचे विकार जडण्याची शक्यता आहे. खड्डे बुजविण्यासाठी माती आणि खडीचे मिश्रण टाकण्या एैवजी हे खड्डे डांबराने योग्य प्रकारे बुजविणे गरजेचे आहे."
-अभिषेक देशमुख, प्रवासी , सुधागड

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com