कोकण रेल्वेचा प्रवास होणार आता गतिमान ; साठ टक्‍केहून अधिक खर्चाची बचत

travelling of konkan railway faster from ratnagiri
travelling of konkan railway faster from ratnagiri

रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गावरील विद्युतीकरणावर आतापर्यंत ७८० कोटी रुपये खर्च झाले असून १ हजार १४० कोटीचा खर्च अजून होणे अपेक्षित आहे. प्रदूषणमुक्‍त आणि वेगवान प्रवासासाठी १० नवी स्थानके आणि ८ लूप लाईन्स उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोकण रेल्वेने यंदा कोरोना काळात महत्वपूर्ण भूमिका बजावली. गेल्या नऊ महिन्यात राष्ट्रीय संकटात श्रमिकांना त्यांच्या राज्यात पोहोचवण्यासह जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा केला. कोरोनाचे सारे नियम पाळत कोकण रेल्वेने त्या काळात १ लाख १० हजार ६२८ श्रमिकांना घरापर्यंत पोहोचवले.

विविध शहरांमध्ये जीवनावश्‍यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होण्याची भीती होती; मात्र कोकण रेल्वेने २४ स्पेशल पार्सल ट्रेन चालवत या अडचणीच्या काळात जीवनावश्‍यक वस्तू विविध शहरात पोहोचवला. कोरोना काळातही विद्युतीकरण आणि मार्ग दुपदरीकरणाच्या कामाचा वेग मंदावू दिला नाही. त्यामुळे प्रदूषणमुक्त इको फ्रेंडली प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. रोहा ते रत्नागिरी या मार्गाचे विद्युतीकरण पूर्णत्वाकडे आले आहे. रोहा ते वीर दरम्यान मार्ग दुपदरीकरणाचे कामही वेगाने सुरू आहे. ऑगस्ट २०१७ मध्ये रोहा ते ठोकूर या ७४० किलोमीटरच्या विद्युतीकरणाचे काम सुरू झाले. त्यातील जवळजवळ ७० टक्‍क्‍यांतून अधिक काम पूर्ण झाले, ते जून २०२१ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. 

साठ टक्‍केहून अधिक खर्चाची बचत

कोकण रेल्वेने विद्युतीकरणावर ७८० कोटी रुपये खर्च केले आहेत. कोकण रेल्वेचा वर्षाला इंधनावर होणारा खर्च २६० ते ३०० कोटींपेक्षा अधिक खर्च होतो. त्यातील साठ टक्‍केहून अधिक खर्चाची बचत होणार आहे. विद्युतीकरणावर अजून १ हजार १४० कोटी रुपये खर्च होणार आहेत. कोकण रेल्वेच्या मार्गावरील प्रवास आधी जलद गतीने व्हावा, यासाठी कोकण रेल्वेच्या मार्गावर १० नवी स्थानके आणि ८ लूप लाईन्स करण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या वर्षात कोकण रेल्वेचा प्रवास अधिक गतिमान होणार आहे.

नावीन्यपूर्ण प्रयोगातही कोरे सरस

नावीन्यपूर्ण प्रयोग आणि संशोधनामुळे कोकण रेल्वे नेहमीच चर्चेत असते. सरत्या वर्षातही कौतुकास्पद कामगिरी केली आहे. यंदा कोकण रेल्वेच्या माध्यमातून नेपाळ सरकारला दोन खास डिझाईन केलेले डेमो प्रदान करण्यात आले. काश्‍मीरमध्ये उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंकच्या या महत्त्‍वपूर्ण कामात टी २ हा महत्त्‍वाचा बोगदा पूर्ण करण्यात कोकण रेल्वेला यश आले आहे. भारत आणि नेपाळ यांना जोडणाऱ्या नव्या रेल्वे मार्गाच्या स्थल निरीक्षणांची जबाबदारीही कोकण रेल्वेकडे सोपवण्यात आली आहे.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com