'देशद्रोहाविरोधात हिंदू संघटन आवश्‍यक '

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मार्च 2017

रत्नागिरी - ‘‘काश्‍मीरमध्ये पाकिस्तान झिंदाबाद, हिंदुस्तानी सैनिक परत जा, असे म्हणणाऱ्यांवर कोणतीच कारवाई होत नाही. देशद्रोहाची अशी लागण पाकिस्तानमधून काश्‍मीर व तिथून जवाहरलाल नेहरू विद्यापीठात आणि पुढे संपूर्ण देशात पसरत आहे. देशद्रोह संपवायचा असेल तर हिंदूंनी संघटित होणे आवश्‍यक आहे,’’ असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी केले.

छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर हिंदू धर्मजागृती सभेत त्यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘जातीपातीच्या आणि अन्य व्यावसायिक संघटनांच्या सभा झाल्या तर त्याला तत्काळ परवानगी मिळते. हिंदू धर्मसभा घ्यायची म्हटले की परवानगी आणि चौकशा होतात. प्रक्षोभक वक्तव्य करू नका, असे बजावले जाते. धर्मावर होणारे आघात सांगणे, आपल्या माता-भगिनींना जागृत करणे हे माझे कर्तव्य आहे आणि ते मी करणारच. माझ्यावर ९२ खटले आहेत व १७ जिल्ह्यांमध्ये बंदी आहे. असे हजार खटले घातले तरीही धर्माचे कार्य करणारच.’’

हिंदू जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक मनोज खाडये यांनी सांगितले, की अल्पसंख्याकांचे लांगूलचालन केले जात आहे. प्रार्थनास्थळांवरील अनधिकृत भोंगे उतरवण्याचा आदेश न्यायालयाने देऊनही ते उतरवलेले नाहीत. हिंदू संघटन मजबूत करण्यासाठी गावागावात नियोजन बैठका, धर्मशिक्षण वर्गाच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे.

Web Title: Treason against the Hindu organization