वृक्षतोडीमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक एक तास ठप्प

सुनील पाटकर
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

महाड : मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर ते कशेडी या भागाच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू असून या कामामध्ये महामार्गाच्या लगत असणाऱ्या मोठ्या वृक्षांची तोड करताना कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याने आज (गुरुवार) सायंकाळी या वृक्षतोडीमुळे महामार्गावरील वाहतूक एक तास ठप्प झाली. याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागला.

शहरालगत मोटेल विसावाजवळ असलेला महाकाय वृक्ष तोडण्याचे काम तब्बल एक तासावर सुरू राहिल्याने महामार्गवरील दोन्ही बाजूची वाहने ठप्प झाली व महामार्गावर लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. झाडे तोडण्याचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराकडून एक जसीबी मशीन तीन इलेक्ट्रिक कटर व चार माणसे यातून हे काम करण्यात आले. यामुळे हे झाड हटविण्यासाठी तब्बल एक तास महामार्ग दोन्ही बाजूंनी ठप्प झाला होता. त्यात प्रवाशांना रोखावयास महामार्ग पोलिसच हजर नसल्याने मार्गावर वाहतुकीचा गोंधळ उडाला.

वृक्ष तोड करताना वाहतूक वळवणे, वाहनचालकांना दिशा दाखवणे व सुरक्षितता बाळगणे या बाबी आवश्यक असतानाही त्याकडे दुर्लक्ष झालेले दिसत होते. या मार्गाच्या कामात खूप झाडे तोडणे बाकी आहे. प्रशासनाने आणि कंपनी ठेकेदारांनी प्रवाशांना सतर्क करुन याबाबत नियोजन करून ही झाडे तोडावित अशी प्रवासी आणि वाहनचालक यांची मागणी आहे.

Web Title: Tree Cutting Traffic Problem for one Hour