पडवीत आईच्या प्रेमापोटी 123 वृक्षांची लागवड

tree
tree

पुणे : पडवी (ता. दौंड, जि. पुणे) येथे आईचं बन या संकल्पनेतून केडगाव परिसरातील व्यक्तींनी 123 वृक्षांची लागवड केली. 

"एकच लक्ष्य आईचं वृक्ष" हे ध्येय घेऊन एक मित्र एक वृक्ष या परिवारातील युवकांनी मोठ्या कष्टाने पडवीच्या उजाड माळरानावर आईचं बन साकारलं आहे. हे बन साकारण्यासाठी पडवी ग्राम पंचायतीचे विशेष सहकार्य मिळाले. एक मित्र परिवाराने आईच्या नावाने वृक्ष लावण्याचे आवाहन केले होते. यासाठी शंभर झाडांचं उद्दिष्ट ठेवले होते. मात्र आईच्या नावाने झाड लावायचे असल्याने येथे 123 जणांनी आपल्या आईच्या नावाने ट्री गार्डसह सुमारे 6 फूट उंचीची झाडे लावली आहेत. एक मित्रचा पाचवा वर्धापन दिन व मंगलबाई मुथा यांचा स्मृतीदिन यानिमित्त आईचं बन साकारण्यात आले आहे. ज्येष्ठ व्यापारी सुगंधीलाल मुथा यांनी आईच्या बनाचे उद्घाटन केले. 

या झाडांसाठी खड्डे खोदणे, झाडांची वाहतूक करणे, ट्री गार्ड स्वतः बनवणे, ट्री गार्ड वर नाव लावणे यासाठी एक मित्र चे प्रमुख प्रशांत मुथा,  दादा गावडे, लहू धायगुडे, कानिफनाथ मांडगे, गोपीनाथ रानवडे, जगदीश रानवडे, राजू पवार, सुभाष फासगे, मॉन्टी काकडे, रवी नांदखीले, मनोहर शेळके, जनार्दन सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले. जवाहरलाल विद्यालयातील 94च्या दहावीच्या बॅच मधील विद्यार्थ्यांनी 50 तर जैन सोशल ग्रुप पुणे यांनी 100 मोठ्या झाडांची मदत केली आहे. पडवी येथे लावलेल्या झाडांमध्ये तीस प्रकारचे देशी वृक्ष आहेत. पडवी येथील दर्ग्यालगत ही झाडे लावण्यात आलेली आहे. एक मित्रने गेल्या पाच वर्षात केडगाव परिसरात २३०० झाडे लावली आहेत. लावलेल्या झाडांची देखभाल "एक मित्र" वर्षभर करीत असतो त्यामुळे यातील ९० टक्के झाडे आज सुस्थितीत आहेत. डॉ. श्रीवर्धन अवचट यांनी सूत्रसंचालन केले.

आईच्या नावाने झाड लावण्यात एक भावनिक समाधान आहे. भावनिकतेमुळे वृक्षारोपणाला   लोक सहज पुढे येतात. हा आमचा अनुभव आहे.  प्रत्येक गावातील युवकांनी एकत्र येऊन सार्वजनिक ठिकाणी आईच बन साकारलं पाहिजे. असे एक मित्रचे प्रमुख प्रशांत मुथा यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com