मुंबई गोवा महामार्गावर झाड तुटले

अमित गवळे
गुरुवार, 12 जुलै 2018

का झाड्याच्या मोठ्या फांद्या गुरुवारी पाऊस व वाऱ्यामुळे रस्त्यावर कोसळल्या. यावेळी कोणतीही जिवित हानी झाली नाही. 

पाली (जि. रायगड) - मुंबई गोवा महामार्गावर इंदापुर ते माणगाव दरम्यान कशेणे गावाजवळ झाड तुटले. ही घटना गुरुवारी (ता. 12) सकाळी घडली. झाड हटवेपर्यंत यामार्गावरुन वाहतूक धिम्या गतीने सुरु होती.
 

mumbai goa highway

या मार्गावर इंदापुर ते कशेणे गावादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा मोठी झाडे आहेत. त्यातील काही झाडे कमकूवत झाली आहेत. यापैकी एका झाड्याच्या मोठ्या फांद्या गुरुवारी पाऊस व वाऱ्यामुळे रस्त्यावर कोसळल्या. यावेळी कोणतीही जिवित हानी झाली नाही. या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरु असल्याने ताबडतोब क्रेन व जेसीबीच्या सहाय्याने झाड हटविण्याचे काम सुरु झाले होते. सकाळी साडे दहा वाजेपर्यंत फांद्या हटविण्याचे काम सुरुच होते. मात्र झाडाच्या फांद्या हटवेपर्यंत वाहतूक एका बाजुने व धिम्या गतीने सुरु होती.

mumbai goa highway

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Trees break out on the Mumbai Goa highway