रवाळजेच्या मुख्य रस्त्यावर कोसळलेली झाडे अजूनही जैसे थे!

अमित गवळे  
मंगळवार, 16 एप्रिल 2019

जुन्या पोलीस स्थानकाजवळील एका इमारतीला लागून हे झाड होते. रविवारी झालेल्या पावसात हे झाड कोसळले. या झाडाचा काही भाग मुख्य रस्त्यावर आला आहे.

पाली (जि. रायगड) : माणगाव तालुक्यातील रवाळजे गावाजवळ मुख्य रस्त्याच्या बाजूचे झाड रविवारी (ता. 14) रात्री कोसळले. दोन दिवस उलटूनही हे झाड काढण्यात आलेले नाही. 

जुन्या पोलीस स्थानकाजवळील एका इमारतीला लागून हे झाड होते. रविवारी झालेल्या पावसात हे झाड कोसळले. या झाडाचा काही भाग मुख्य रस्त्यावर आला आहे. परिणामी अर्धा रस्ता व्यापला गेला आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. सोमवारी (ता. 16) दुपारपर्यंत हे झाड तेथे जैसे थे होते. त्यामुळे अपघाताचा धोका संभवतो.

 
pali


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trees that have collapsed on the main road of Ravale are still there