गणपतीपुळ्यात उभारणार ‘ट्रिटेड’ कोकणी हट्‌स

गणपतीपुळ्यात उभारणार ‘ट्रिटेड’ कोकणी हट्‌स

रत्नागिरी - पर्यटनवृद्धीच्या दृष्टीने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ स्पर्धेत उतरले आहे. देशभरात नाव असलेल्या गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात ४० कोकणी हट्‌स बांधण्याच्या कामाला सुरवात केली आहे. ‘ट्रिटेड’ म्हणजे प्रक्रिया केलेल्या बांबूंनी हे अतिशय आकर्षक असे हट्‌स उभारले जाणार आहेत. किनाऱ्यावर इलेक्‍ट्रिक बाईक, मालगुंड किनाऱ्यावर व्यावसायिक करार करून पॅराग्लायडिंग आदी सुविधा उपलब्ध करून पर्यटनकांना आकर्षित करण्यात येणार आहे. कोट्यवधीचा निधी त्यासाठी खर्ची केला जाणार आहे. 

गणपतीपुळे येथील कोकणी हट्‌स बंद पडल्याची चर्चा होती; परंतु ते जुने आणि खराब झाल्यामुळे त्याचा वापर पर्यटन विकास महामंडळाने टाळला होता. देशी-विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी काही नवे आणि तेथे राहण्याच्या दृष्टीने करमणुकीचे पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. गणपतीपुळे येथे ४० कोकणी हट्‌स उभारण्यात येत आहेत. त्यापैकी २५ हट्‌सचे काम सुरू झाले आहे. ‘ट्रिटेड’ म्हणजे प्रक्रिया केलेल्या बांबूंनी अतिशय आकर्षक पद्धतीने हे हट्‌स उभारले जाणार आहेत. संबंधित कंपनीकडून ही हट्‌स बांधून घेण्यात आली आहेत. त्यांनी याची ७ वर्षांची हमी दिली आहे. एका हट्‌सची किंमत सुमारे १२ लाख एवढी आहे. लोकांनी सीआरझेडचा बाऊ न करता त्यातून पर्याय शोधून पर्यटन विकास करावा, असे पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी श्री. चव्हाण यांचे मत आहे.

गणपतीपुळे येथे नवी इमारत उभारण्यात येणार आहे. जी प्लस टू, अशी त्याची रचना आहे. ५० लोक राहतील अशा खोल्या बांधण्यात येणार आहेत. पर्यटकांना समुद्र किनाऱ्याची सफर करता यावी, यासाठी इलेक्‍ट्रिक बाईक खरेदी करण्यात येणार आहेत. त्या पूर्ण फायबरच्या असल्याने खऱ्या पाण्यात गंजण्याचा संबंध येणार नाही. मालगुंड येथे पॅराग्लायडिंग सुरू करण्यात येणार आहे. खासगी संस्थेची व्यावसायिक करार करून पर्यटकांना ही थरारक सैर करता यावी, हा याचा मुख्य उद्देश असणार आहे. 

३ कोटी ९ लाख मंजूर
या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १३ पर्यटनस्थळांची निवड झाली आहे. यामध्ये बाणकोट, वेळास, लाडघर, कर्दे, वेळणेश्‍वर, गणेशगुळे, उक्षी, भालावली, देवीहसोळ, साखर, वाडापेठ, गोवळ, भडे या गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये रस्ते, स्थळदर्शन फलक, वाय-फाय सुविधा, प्रसाधन व स्वच्छतागृह, स्वागत कक्ष, बालोद्यान, स्वीस टेंट, कचरा पेटी, रस्ते, रेलिंग, कातळशिल्पास सेलम स्टील कंपाउंड, सौरदीप या कामांचा समावेश आहे. ग्रामीण पर्यटन विकासाच्या दृष्टीने पर्यटन विकास महामंडळाला हा निधी मंजूर झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com