ट्रू व्होटर ऍपला अल्प प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

कार्यकर्त्यांना मार्गदर्शक
पक्षांच्या कार्यकर्त्याकडून व उमेदवारांकडून याचा मोठ्या प्रमाणावर वापर होण्याची शक्‍यता आहे. प्रभागनिहाय असलेल्या मतदार यादीत आडनाव निहाय मतदारांची यादी सहज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे दोन्ही बाजूच्या मतदारांची आकडेवारी यांचा हिशोब करुन राजकीय गणित मांडण्यास सोपे जाणार आहे. निवडणूक कालावधीमध्ये या ऍपचा उपयोग विरोधी पक्षांनेत्याकडून मतमोजणीच्या उत्सुकतेवेळी मात्र त्या त्या पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. हे ऍप मोबाइलद्वारे एकमेकांना पाठविणेही शक्‍य आहे.

सावंतवाडी  : येथील नगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची यंत्रणा हायटेक झाली आहे. पूर्वी आपल्या प्रभागातील मतदारांचे नाव शोधण्यासाठी मतदार यादीची पाने चाळावी लागत होती. परंतु सध्याच्या आधुनिक युगात उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मोबाइलमध्ये ट्रू-व्होटर ऍपची नवीन हायटेक प्रणाली कार्यान्वित झाली आहे. परंतु पक्ष कार्यकर्ते, उमेदवार व काही मतदार सोडता याच्या माहितीचा हवा तेवढा प्रसार झालेला दिसून येत नाही. संपूर्ण राज्यभर हे ऍप कार्यान्वित आहे.
आधुनिक जमान्यात प्रत्येक क्षेत्रात नवनवीन बदल घडून येत आहेत. यात सोपे व सुलभ व्हावे यासाठी मोबाइल युगातही नवनवीन ऍप्लिकेशन प्रणाली येत आहे. राज्यभरात होणाऱ्या निवडणुकाही याला अपवाद नसून ट्रू-व्होटर ऍपद्वारे मतदार व उमेदवारांनाही हायटेक करण्याचा प्रयत्न राज्य निवडणूक आयोगाने केला आहे. त्यामुळे मतदार यादीची 100 ते 150 पाने चाळण्यापेक्षा मोबाइलमध्ये हे ऍप कार्यान्वित केल्यास निवडणुकीसंदर्भातील माहिती एका क्‍लिकवर मिळणार आहे. यामध्ये कुठल्या प्रभागात किती मतदार, उमेदवाराचे नाव व माहिती, त्यांची निशाणी, विरोधी पक्षनेते कोण अशा अनेक बाबींची माहिती या ऍपद्वारे मिळणार आहे. प्रचारासाठी नियोजनाच्या मतदारयाद्या पी.डी. एफ फॉर्मेटमध्ये एका सॉफ्टवेअरमध्ये उपलब्ध आहे. आचारसंहिता काळात यासदर्भात माहितीही येथील निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी दिली होती. त्या वेळी वेगवेगळ्या विभागांचे प्रतिनिधी, अधिकारी तसेच राजकीय उमेदवारच उपस्थित होते. मात्र खास उमेदवार व मतदारांसाठी बनविलेल्या या ऍपची माहिती मतदारांनाच नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकाही जवळ येत आहेत. त्या निवडणुकांची माहितीही या ऍप मध्ये मिळणार आहे. परंतु ग्रामीण भागात मोबाइल रेंजच्या सुविधांचा अभावामुळे या ऍपचा फारसा उपयोग होणार असे वाटत नाही. मात्र शहरी भागाचा झपाट्याने होत असलेल्या विकासाचा विचार करता तसेच पालिका व पंचायती निवडणुका पाच वर्षांनी येतात ही बाब लक्षात घेता ट्रू-व्होटर ऍपची माहिती नगरपालिका निवडणूक मतदारांना होणेही आवश्‍यक आहे. मतदार यादीत आपले नाव आहे की नाही याची माहिती मिळणे सोपे झाले असते. मात्र काही प्रशासकीय उमेदवार, अधिकारी, उमेदवार व काही जाणकार मतदार सोडले तर ऍपचा पुरेसा प्रचार व प्रसाराची गरज आहे. राज्य निवडणूक आयोगाने हायटेक प्रणाली कार्यान्वित करुन काही उपयोग व त्याची माहितीच झाली नाही तर अशा गोष्टीचा उपयोग शून्यच समजावा असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शक
पक्षांच्या कार्यकर्त्याकडून व उमेदवारांकडून याचा मोठ्या प्रमाणावर वापर होण्याची शक्‍यता आहे. प्रभागनिहाय असलेल्या मतदार यादीत आडनाव निहाय मतदारांची यादी सहज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे दोन्ही बाजूच्या मतदारांची आकडेवारी यांचा हिशोब करुन राजकीय गणित मांडण्यास सोपे जाणार आहे. निवडणूक कालावधीमध्ये या ऍपचा उपयोग विरोधी पक्षांनेत्याकडून मतमोजणीच्या उत्सुकतेवेळी मात्र त्या त्या पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. हे ऍप मोबाइलद्वारे एकमेकांना पाठविणेही शक्‍य आहे.

Web Title: true voter apps gets little response