वन्य प्राण्यांची शिकारी केल्याच्या संशयावरून दोघे ताब्यात 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

देवगड - वन्यप्रजातीतील प्राण्यांची शिकार केल्याच्या संशयावरून वन विभागाने तालुक्‍यातील दोघा संशयित युवकांना ताब्यात घेतले. सुमारे दीड वर्षापूर्वी शिकार केलेल्या वन्य प्राण्यांसोबत काढलेली छायाचित्रे वन विभागाकडे उपलब्ध झाल्याच्या आधारे वन्यजीव (संरक्षण) अधिनियमांतर्गत काल (ता. 31) ही कारवाई केली. 

देवगड - वन्यप्रजातीतील प्राण्यांची शिकार केल्याच्या संशयावरून वन विभागाने तालुक्‍यातील दोघा संशयित युवकांना ताब्यात घेतले. सुमारे दीड वर्षापूर्वी शिकार केलेल्या वन्य प्राण्यांसोबत काढलेली छायाचित्रे वन विभागाकडे उपलब्ध झाल्याच्या आधारे वन्यजीव (संरक्षण) अधिनियमांतर्गत काल (ता. 31) ही कारवाई केली. 

दोन्ही संशयितांना आज येथील न्यायालयाने शनिवारपर्यंत (ता. 3) वनकोठडी सुनावली आहे. सचिन चंद्रकांत कावले (वय 36, रा. जामसंडे) आणि बाळकृष्ण धोंडू कुणकेश्‍वरकर (45, रा. कुणकेश्‍वर) अशी संशयितांची नावे आहेत. दरम्यान, यामध्ये आणखी काही संशयितांची नावे समोर येण्याची शक्‍यता आहे. 
याबाबतची माहिती अशी, शिकार केलेल्या वन्य प्राण्यांसोबत काढलेली छायाचित्रे वन विभागाच्या हाती लागली. त्यावरून यातील संशयितांचा शोध सुरू झाला. त्यानुसार बुधवारी (ता. 31) सायंकाळी वन विभागाचे पथक जामसंडे येथे दाखल झाले.

यामध्ये सहायक वनसंरक्षक श्री. जळगावकर, वनक्षेत्रपाल एस. बी. सोनवडेकर, वनपाल व्ही. आर. मुळे, वनरक्षक आर. एल. बिक्‍कड, वनरक्षक ए. एच. राठोड आदींचा समावेश होता. पथकाने जामसंडे येथे संशयित कावले यांच्याकडे प्राथमिक चौकशी केली असता दुसरा संशयित कुणकेश्‍वरकर हाही यामध्ये सहभागी असल्याचे समोर आले. वन विभागाने दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी वनपरिक्षेत्र कार्यालय कणकवली येथे नेले. त्यांना वन विभागाकडे उपलब्ध झालेली माहिती आणि काही छायाचित्रे दाखवली असता संबंधित घटना दीड ते दोन वर्षांपूर्वीची असल्याचे चौकशीत समोर आले. 

यांची केली शिकार 
रानडुक्‍कर, रानकोंबडा, लांडोर, ससा आदी प्राण्यांची शिकार केल्याचेही चौकशीत निष्पन्न झाले. या घटनेमुळे वन्य प्राणी शिकार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two arrested in wild animals hunting case