esakal | हृदयद्रावक , संपूर्ण कुटुंब उद्धवस्त : लहान भावाच्या मृत्युच्या धक्क्याने मोठ्या भावाचाही मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

two brothers Heart attack death case in chiplun ratnagiri

दोन सख्या भावांचा एकाच दिवशी मृत्यू
चिपळूण पवार आळीतील घटनेने हळहळ 

हृदयद्रावक , संपूर्ण कुटुंब उद्धवस्त : लहान भावाच्या मृत्युच्या धक्क्याने मोठ्या भावाचाही मृत्यू

sakal_logo
By
नागेश पाटील

चिपळूण (रत्नागिरी ) : पतीचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर पत्नीचे निधन झाल्याची दुर्दैवी घटना संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते गावात घडल्याचे पुढे येताच चिपळूणमध्येही अशीच एक दुर्दैवी घटना घडली आहे. आपल्या लहान भावाचा मृत्यू झाल्याचे समजताच मोठ्या भावालाही हृदयविकाराचा धक्का बसला आणि त्याचेही निधन झाले. दोन्ही सख्ख्या भावांचे काल गुरुवारी एकाच दिवशी निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. 

हेही वाचा -वेंगुर्लेत गणेशोत्सवात रस्त्यावरील बाजार बंद -


चिपळूण शहरातील पवारआळीमध्ये ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. संदेश पवार याला आज अचानक श्वसनाचा त्रास होऊ लागला. चिपळूणमधील दवाखान्यात कुठेही त्याला घेण्यात आले नाही. म्हणून कामथे येथे नेण्यात आले. मात्र तेथे त्याचा दुपारी १ वाजता मृत्यू झाला. आपल्या लहान भावाचा मृत्यू झाल्याचे समजताच मोठा भाऊ सुभाष पवार याला हृदयविकाराचा धक्का आला. त्याला खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले असता त्याचाही तेथे मृत्यू झाला.

हेही वाचा - प्रवाशांसाठी सुचना : २० ऑगस्ट पर्यंत या पर्यायी मार्गावरुन धावणार कोकण रेल्वे,  असे आहे वेऴापत्रक वाचा -

लहान भावाच्या मृत्यूचे दुःख सहन न झाल्याने मोठ्या भावानेही आपले प्राण सोडले. संदेशचे वय सुमारे ४८ वर्षे होते तर सुभाषचे वय पन्नासच्या आसपास होते. संदेश पवार हा रिक्षा चालवीत असे. दोन्ही भावांच्या मृत्यूमुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या दोन्ही भावांचे स्वॅब घेण्यात आले असून त्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.

संपादन - अर्चना बनगे

loading image