चोरट्यांनी गोठ्यातून पळवल्या दोन म्हशी

सुनील पाटकर
शुक्रवार, 4 मे 2018

महाड : गुरांच्या गोठ्यात बांधून ठेवलेल्या दोन म्हशीच चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना महाड तालुक्यातील पाचाड गावात काल 3 मे ला घडली.या म्हशींची किंमत साठ हजार रुपये असुन या प्रकरणी महाड तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील .हिरकणीवाडी येथे राहणारे महादेव अवकिरकर यांनी याबाबत महाड तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अवकिरकर यांचा पाचाड गावच्या हद्दीत गोठा असुन त्यांच्या मालकीच्या गोठ्यातून 3 मे ला साठ हजार रुपये किंमतीच्या दोम म्हशी कोणीतरी चोरून नेल्या.

याबाबत महाड तालुका पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस नाईक एस.एस.गुरव हे करीत आहेत. 

Web Title: The two buffaloes theft by robbers