कंटेनरची दुचाकीला धडक दोन जागीच ठार; जमावाकडून तोडफोड

सिद्धेश परशेट्टे
शनिवार, 14 एप्रिल 2018

अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी वाहतूक रोखळी. ठेकेदाराला बोलावण्यासाठी ग्रामस्थांनी हरतर्‍हेचे प्रयत्न केले. वातावरण तंग झाल्याचे कळताच तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ठेकेदाराला बोलावण्याचा प्रयत्न केला.

खेड : मुंबई - गोवा महामार्गावर दिवाणखवटी येथे कंटेनरने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एक तरूण व दोघे बालक असे दोघेजण जागीच ठार झाले. विशाल विश्‍वास मोरे (वय. 22, सतीचा कोंड, ता. खेड) असे त्या तरूणाचे नाव असून ठार झालेला बालक त्याचा नातेवाईक आहे. त्याचे नाव समजू शकले नाही. अपघातानंतर संतप्त जमावाने कंटेनर व महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणार्‍या कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली.  त्यामुळे तेथे वातावरण तंग असून सुरक्षा दलाचे जवान दाखल झाले आहेत. 

आज सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान हा अपघात झाला. रस्त्याच्या मधोमध मोरीचे काम सुरू आहेत. तेथून बाजू काढताना कंटेनरने दुचाकीला धडक दिली. त्यामुळे हा अपघात झाला. चौपदरीकरणाचे काम करणार्‍या कंपनीकडून हलगर्जीपणा झाल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी रस्त्यावर ठिय्या मांडला. त्यामुळे तब्बल चार तास महामार्गावरील वाहतूक ठप्प होती. ठेकेदार बोलावूनही न घटनास्थळी न आल्याने संतप्त झालेल्या जमावाने अपघातास कारणीभूत असलेला कंटेनर तसेच महामार्गावरील मोरवंडे - बोरज येथील कंपनीच्या कार्यालयाची मोडतोड केली. 

अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी वाहतूक रोखळी. ठेकेदाराला बोलावण्यासाठी ग्रामस्थांनी हरतर्‍हेचे प्रयत्न केले. वातावरण तंग झाल्याचे कळताच तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ठेकेदाराला बोलावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने दाद दिली नाही. आमदार संजय कदम हेही घटनास्थळी पोहचले. त्यांच्या बोलावण्यावरूनही ठेकेदार घटनास्थळी आला नाही. यामुळे ग्रामस्थांचा संताप वाढतच गेला. महामार्गावर पडलेली प्रेते हलविण्यासही ग्रामस्थांनी चार तास विरोध केला. पोलिसांना पंचनामाहा करता आला नाही. ग्रामस्थांनी तोडफोड सुरू केल्यावर महामार्गावर थांबलेल्या छोट्या गाड्यांनी तेथून जाणेच पसंत केले. सकाळी दहा वाजेच्या दरम्यान पोलिस फाटा अपघातस्थळी आला. मात्र जमान नियंत्रित न झाल्याने सुरक्षा दलाचे जवानही दाखल झाले. ग्रामस्थांनी कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर कर्मचारी व अधिकारी तेथून पळून गेले. 
 

Web Title: two dead in accident khed