रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावर अपघातामध्ये पुण्याचे दोघे ठार

रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावर अपघातामध्ये पुण्याचे दोघे ठार

देवरुख - भरधाव वेगातील गाडी झाडावर आदळून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर चौघे गंभीर जखमी झाले. हा अपघात आज सकाळी ७ च्या सुमारास रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावर साखरपा जवळच्या दाभोळे येथे घडला. 

पुण्यातील दुष्यंत श्रीरंग वालगुडे (वय 28) हे मोटार (एमएच-12-पीटी-7642) घेऊन पाच मित्रांसह पुणे- कोल्हापूरमार्गे गणपतीपुळे येथे निघाले होते. आज पहाटे 6 च्या दरम्यान कोल्हापूर येथे महालक्ष्मीचे दर्शन घेऊन त्यांची गाडी गणपतीपुळेकडे रवाना झाली. ही गाडी साखरपा जवळच्या दाभोळे येथे आली असता झोप आल्याने दुष्यंतचा गाडीवरील ताबा सुटला आणि भरधाव वेगातील गाडी दाभोळे माध्यमिक विद्यालयासमोरील डाव्या बाजूच्या झाडावर जाऊन आदळली. अपघातात गाडीच्या दर्शनी भागाचा चुराडा झाला. अपघातात सागर दगडू गांडले (22, जैन मंदिर, कात्रज पुणे), युवराज बळीरात जाधव (21, कोथाळा, जि. जालना) हे दोघे जागीच ठार झाले. दुष्यंतसह अजय परदेसी, श्रीराम पाटील, अनिकेत पाटील (सर्व रा. पुणे) हे चौघे गंभीर जखमी झाले. 

अपघाताचे वृत्त समजताच पोलिस उपनिरीक्षक विक्रम पाटील, प्रमोद वाघाटे, कमलाकर तळेकर, विशाल कांबळे हे सहकार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. दाभोळे विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी, स्थानिक ग्रामस्थ आणि वाहनचालकांनी पोलिसांना सहकार्य करीत जखमींसह मृतदेह बाहेर काढले. चौघा जखमींना तत्काळ साखरपा येथील 108 रूग्णवाहिकेने रत्नागिरीत हलविण्यात आले. यातील दोघांची प्रकृती नाजूक आहे. अपघातस्थळी पंचायत समिती सदस्य जया माने, शीतल करंबळे, संजय कांबळे, युवा नेते बापू शिंदे यांनीही धाव घेत मदत केली. अपघाताची नोंद देवरूख पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com