मोटार उलटून वसईचे दोघे ठार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबाजवळील ईश्‍वर धाब्याजवळ मोटार उलटल्याने दोन ठार, तर अन्य नऊ जण जखमी झाले. हा अपघात सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास झाला.

रोहित अशोक जाधव (वय 23, वसई-विरार) आणि गीता गौतम मोरे (47), अशी मृतांची नावे आहेत.

वसई येथून ते राजापूर तालुक्‍यातील कुरुंग येथे विवाह समारंभासाठी निघाले होते. हातखंबा येथील ईश्‍वर धाब्याजवळ गाडी असता चालक संतोष दत्ताराम मेस्त्री यांचा ताबा सुटला आणि गाडी रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली. त्यामुळे रोहित जाधव व गीता गौतम मोरे गाडीतून बाहेर फेकले गेले आणि दगडावर आपटल्याने ते जागीच ठार झाले.

Web Title: two death in accident