खंडाळा : ट्रक-कंटेनगर अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, ड्रायव्हर जखमी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

अपघातग्रस्त ट्रक क्रेनच्या साहाय्याने रस्त्यावरून हटविण्यात आला असून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.

खोपोली (जि. रायगड) : खंडाळा घाटातील अपघातांची मालिका थांबता थांबत नसल्याचे गुरुवारी (ता.7) पुन्हा एकदा अधोरेखित झाले. ट्रक आणि कंटेनरमध्ये झालेल्या भयानक अपघातात ट्रकमधील क्लिनर आणि सह प्रवासी हे दोघे जागीच ठार झाले. ट्रकने कंटेनरला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला. 

- रापणकर मच्छीमारांमुळे वाचले 'या' जिल्ह्यातील पाच पर्यटकांचे प्राण

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास खोपोली एक्झिट तथा एक्सप्रेस वे ब्रिजजवळ कंटेनर (आर.जे-49 जीए 2023) याला पाठीमागून येणाऱ्या ट्रक (एम.एच-11 एएल 1457) चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने तो कंटेनरला जोराने धडकला.

- भाजप स्थापन करणार अल्पमतातील सरकार

या अपघातात ट्रकमधील क्लीनर आणि एक प्रवासी सुनील शेलार (वय 52, रा. मावड, वडगांव) आणि अरुण मोहिते (वय 40, रा. सांगली) अशी मृत झालेल्यांची नावे आहेत. ट्रक ड्रायव्हर या अपघातात गंभीर जखमी झाला आहे.

- शिवसेनेची भूमिका फक्त संजय राऊतच मांडणार : उद्धव 

महामार्ग पोलीस आणि डेल्टा फोर्सचे जवान, खोपोली पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तत्काळ मदत करून जखमी ड्रायव्हरला खाजगी दवाखान्यात दाखल केले आहे. दरम्यान अपघातग्रस्त ट्रक क्रेनच्या साहाय्याने रस्त्यावरून हटविण्यात आला असून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two killed in truck Container accident at Khandala Ghat