पाली खोपोली मार्गावर दोन भीषण अपघात

अमित गवळे
मंगळवार, 19 जून 2018

या रस्ता रुंदीकरणादरम्यान निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने अवजड वाहनांची चाके मातीत व दगडात फसून अपघात होत आहेत. 

पाली (जि. रायगड) - पाली खोपोली राज्य महामार्गाच्या रुंदिकरणाचे काम सुरु आहे. या रस्ता रुंदीकरणासाठी रस्त्याच्या कडेला टाकलेल्या मातीच्या भरावात सोमवारी (ता. 19) एक मालवाहू ट्रक मातीत फसुन कलंडला. तर एक ट्रक रुंदिकरणासाठी खोदलेल्या खड्ड्यात कोसळल्याने अपघात झाला. या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र दोन्ही ट्रकचे नुकसान झाले.

या रस्ता रुंदीकरणादरम्यान निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने अवजड वाहनांची चाके मातीत व दगडात फसून अपघात होत आहेत. पावसाळ्यात रस्ता खचत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रस्ता रुंदीकरणादरम्यान टप्प्याटप्याने काम न करता जागोजागी रस्ता खोदून ठेवल्याने रस्त्यावरुन वाहने खाली खड्ड्यात कोसळून अपघात होत आहेत.

pali accident

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Two major accidents on the Pali Khopoli road