esakal | ग्रामस्थांनी त्या दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र...
sakal

बोलून बातमी शोधा

two people went for immersion drowned in Ratnagiri

हा प्रकार शहराजवळील भाट्ये टाकळे येथे सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला

ग्रामस्थांनी त्या दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गेलेले दोघे जण काजळी खाडीत बुडाले. त्या दोघांचा शोध सुरू असून हा प्रकार शहराजवळील भाट्ये टाकळे येथे सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला. त्या दोघांचा शोध उशिरापर्यंत सुरू होता. या प्रकारामुळे विसर्जन उत्साहाला गालबोट लागले. 

बुडून बेपत्ता झालेल्यांमध्ये सत्यवान उर्फ बाबय पिलणकर (वय ४८), विशाल पिलणकर (वय २८) यांचा समावेश आहे. जिल्ह्यात दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन सुरु होते.  भाट्ये येथील टाकळे परिसरात गणपती विसर्जन काजळी खाडीमध्ये केले जाते. सायंकाळी गणपती विसर्जन मूर्ती विसर्जनासाठी किनारी भागात आणल्या जात होत्या. पाण्यात अचानक भोवरा तयार झाला. त्यात ते दोघेही सापडले.

हेही वाचा - कोकणात जाखडीचे सूरही हरवले ; वाद्यांची विक्री फक्त २० टक्‍केच 

दोघेही बुडत असल्याचे लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. परंतु ते दोघेही पाण्यात बेपत्ता झाले. सायंकाळी उशिरापर्यंत शोध सुरु होता. ही घटना समजल्यानंतर  शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल लाड घटनास्थळी दाखल झाले होते.  त्या नंतर पोलिस उपअधीक्षक गणेश इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

संपादन - स्नेहल कदम 

loading image