बालविज्ञान परिषदेत रत्नागिरी जिल्ह्यातील दोन प्रकल्प

मकरंद पटवर्धन
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

रत्नागिरी - या महिनाअखेर भूवनेश्वर - ओरिसा येथे होणार्‍या 26 व्या राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेसाठी जिल्ह्यातून आंबडस हायस्कूलची आरती मोरे व एम. एस. नाईक हायस्कूलची मनवा कांबळे यांची निवड झाली.

आरती मोरे हिने ग्रीन ग्रास फ्रॉम अ‍ॅग्रिकल्चरल वेस्ट, मनवा कांबळेने इको फ्रेन्डली अँड बायोडिग्रेडेबल हायजिफिल मेनशुरल पॅड या दोन प्रकल्पांचा आराखडा सादर केला. त्यांना एम. एस. नाईकचे नवाज मोंगल व आंबडसचे संतोष गोनबरे, राजेंद्र बंबाडे यांचे मार्गदर्शन लाभले. गोगटे-जोगळेकर कॉलेजचे प्रा. सुयोग सावंत यांनी राज्यस्तरावरील मूल्यमापन समितीमध्ये सलग पाचव्यांदा काम केले.

समन्वयक आश्रय सेवा संस्थेचे अध्यक्ष अरुण मुळ्ये यांनी सांगितले की, हराळी- उस्मानाबाद येथे राज्यस्तरीय परिषदेत 73 प्रकल्प सादर झाले. त्यात जिल्ह्यातील पाच प्रकल्प होते. यामध्ये न्यू इंग्लिश स्कूल खेर्डी येथील सानिका लंबाडे, तन्वी वनवे, एम. एस. नाईकचा नवेद हुनेरकर यांचा समावेश होता. यातून 30 प्रकल्पांची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली.

आश्रयचे काम उल्लेखनीय

आश्रय सेवा संस्था 13 वर्षांपासून हा उपक्रम राबवित आहे. यापूर्वी अनेक प्रकल्प राष्ट्रीय स्तरावर सादर झाले आहेत. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेला हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल खेर्डीचे मुख्याध्यापक, सहकारी, शिवाजी पाटील, प्रा. सुमेध मोहिते व प्रा. रुपेश ताम्हनकर यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Two Projects in Ratnagiri District in Children Science Conference