सुधागड तालुक्यात वाघ नखे विकणारे दोन तस्कर पकडले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

पाली - सुधागड तालुका वन्यजीव व त्यांचे अवयव विकणाऱ्या तस्करांचे केंद्र बनला आहे. नुकतेच येथे वाघनखे (बिबट्याचे नखे) विकणार्‍या दोघा जनांना वनविभागाच्या अधिकार्‍यांनी सापळा रचून पकडले.

मागील आठवड्यातच सुधागड तालुक्यातील राबगाव येथे औषध व काळ्या जादूसाठी मांडुळ या दुर्मीळ प्रजातीच्या तब्बल 1 करोड 10 लाख किंमतीच्या तीन सापांची तस्करी करणार्‍या तीन तस्करांना स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाच्या अधिकार्‍यांनी पकडले होते. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पालीत बिबट्याच्या नख्यांची विक्री होणार असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार सोमवारी (ता.3) उपवनरक्षक अलिबाग, सहाय्यक वनरक्षक अलिबाग यांचे मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वनअधिकारी सुधागड पाली व सुधागड वनक्षेत्र कर्मचारी यांनी पाली येथील स्टेट बँकेजवळील मोकळ्या जागेत सापळा रचला. त्यावेळी महादेव शंकर वरगडे यांच्याजवळ बिबट्याची अकरा नखे विक्री करण्याच्या उद्देशाने आणल्याचे दिसून आले. वरगडे यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी ही नखे सखाराम तुकाराम फसाळ रा. दर्यागाव ता.सुधागड यांच्याकडून विकत घेवून विक्री करण्यासाठी घेतल्याचे सांगितले. त्यानुसार सखाराम फसाळे यांना देखील वनविभागाच्या अधिकार्‍यांनी ताब्यात घेतले. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 9,39,49/ (ए)(बी),50,51 अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी फसाळ व वरगडे यांना रोहा येथील न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना 18 डिसेंबर पर्यंतची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सुधागड वनक्षेत्रपाल समीर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभाग तस्कर व अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई करत आहे. 

Web Title: Two smugglers of tiger nails were found in Sudhagad taluka