कोकण रेल्वे मार्गावर दोन समर स्पेशल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 एप्रिल 2019

खेड - उन्हाळी सुटी हंगामात रेल्वेगाड्यांना उसळणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून एकामागोमाग एक उन्हाळी स्पेशल गाड्यांची खैरात केली आहे. या मार्गावर आणखी दोन समर स्पेशल रेल्वे सोडण्यात येणार आहेत. या गाड्या एप्रिल ते जून या कालावधीत धावणार आहेत.

उन्हाळी सुटी हंगामात गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षणीय असते. या शिवाय मुंबईहून गावाकडे व गावाकडून मुंबईला जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या सर्वाधिक असते. उन्हाळी सुटी हंगामासाठी रेल्वे प्रशासनाने यापूर्वीच १२ उन्हाळी स्पेशल गाड्या जाहीर केल्या असून ८ एप्रिल ते ८ जून या कालावधीत धावणार आहेत. यानंतर आणखी ४ समर स्पेशल गाड्यांची घोषणा केली आहे.

या पाठोपाठ मुंबई -सीएसटी-कोचुवेली एक्‍स्प्रेस १५ एप्रिल ते ३ जून या कालावधीत धावणार आहे. ती दर सोमवारी सीएसटीहून सुटणार आहे. परतीच्या प्रवासात १६ एप्रिल ते ४ जून या कालावधीत दर मंगळवारी कोचुवेलीहून रात्री ११ वाजता सुटणार आहे. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सांवतवाडी, थिवीम, करमाळी, मडगाव, कारवार, कुमठा, मुर्डेश्‍वर, भटकळ, बिंदूर, कुंदापूर, उड्डपी, मुलकी आदी ठिकाणी थांबे दिले आहे. उन्हाळी सुटीसाठी पुणे - एर्नाकुलम ही साप्ताहिक गाडी १५ एप्रिल ते ३ जून या कालावधीत धावेल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Summer Specials trains on Konkan Railway route