मोटारीची धडक बसल्याने दुचाकीस्वार ठार

सुनील पाटकर
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

महाड (रायगड): मुंबई गोवा महामार्गावर चांढवे गावच्या हद्दीत मोटारची दुचाकीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. आज (शुक्रवार) दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान हा अपघात घडला.

नितीन गजानन सालेकर(वय. 35 रा. कोंडिवते) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव असून ते आपल्या दुचाकीने कोंडिवते गावाहून पोलादपूरकडे निघाले होते. चांढवे गावाजवळ समोरुन येणा-या आयटेन या मोटारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकी वरील नितीन यांचा मृत्यु झाला. या घटनेची नोंद एमआयडिसी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे

Web Title: Two wheelers killed in a car accident