esakal | दुर्दैवी घटना ; कोकणात विसर्जनावेळी दोघे बुडाले
sakal

बोलून बातमी शोधा

two youth are dead during ganesh visarjan in ratnagiri

अडूरःबाटलेवाडी येथील पाचजण पाण्यात पडले. यातील दोघांना पोहता येत नसल्याने ते बुडाले, तर अन्य तिघे बचावले.

दुर्दैवी घटना ; कोकणात विसर्जनावेळी दोघे बुडाले

sakal_logo
By
मुझफ्फर खान

चिपळूण : कोकणात आज पाच दिवसाच्या गणपती सोबत गौरी विसर्जनही आज सुरू आहे. यातच तालुक्‍यातील बोऱ्या गावच्या विसर्जनाला गालबोट लागले. यावेळी पाचजण पाण्यात पडले, त्यापैकी दोन तरूण बुडाले असून त्यांचा शोध सुरू आहे. समुद्रकिनारी जेटीवरून गणपती विसर्जन करताना जोरदार लाटेच्या धडकेने अडूरःबाटलेवाडी येथील पाचजण पाण्यात पडले. यातील दोघांना पोहता येत नसल्याने ते बुडाले, तर अन्य तिघे बचावले. वैभव वसंत देवळे व अनिकेत हरेश हळये अशी दोघांची नावे आहेत.

हेही वाचा - एसटीच्या देखाव्यातून केले समाजप्रबोधन; वाचा सविस्तर..

सायंकाळी साडेचार वाजता ही घटना घडली. अडूरसह बोऱ्या येथील ग्रामस्थ बोऱ्या समुद्रकिनारी गणेशमूर्ती विसर्जन करतात. अडूर भाटलेवाडी येथील गणपती बोऱ्या आणि कारुळ या दोन गावांमध्ये असलेल्या स्मशानभूमीजवळ विसर्जन करतात. सायंकाळी साडेचार वाजता विसर्जन सुरू असताना भाटलेवाडी येथील पाच युवक गणपतीची मोठी मूर्ती किनाऱ्याच्या बाजूला असलेल्या जेटीवरून विसर्जन करण्यासाठी गेले. याचवेळी मोठी लाट जेटीवरून गेल्याने या लाटेच्या तडाख्याने गणपतीसह पाचहीजण समुद्रात बुडाले. 

हेही वाचा - परतीच्या प्रवासासाठी चाकरमान्यांची एसटीला पसंती...

यातील दोघांना पोहता येत नसल्याने ते बुडाले. त्यांचा शोध सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. गणेश मूर्ती मोठी असल्याने ते मूर्ती गाड्यावरून नेत होते. यादरम्यान पाण्याची जोरात लाट आली आणि गणेश मुर्ती गाडा आणि पाच जण समुद्राच्या पाण्यात पडले. पोहता येणारे तिघे बाहेर आले मात्र देवळे आणि हळद दोघे पाण्यात बुडाले. हे समजल्यानंतर तेथे उपस्थित लोकांनी दोघांचा शोध सुरू केला परंतु पाण्याची लाट मोठी असल्याने, त्या दोघांचा शोध लागला नाही. सायंकाळी उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती या घटनेची माहिती गुहागर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.


संपादन - स्नेहल कदम