टायपिंग इन्स्टिट्यूटचालक उपासमारीच्या वाटेवर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

माणगाव - टाईपरायटिंगचे शिक्षण देणाऱ्या संस्था बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे या संस्था चालवणाऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल, अशी व्यथा या संस्थांचे चालक मांडत आहेत.

संगणक की-बोर्डचा प्रथमावरता असलेल्या टाईपरायटिंग मशीनवर धडे घेऊन आजवर अनेक विद्यार्थ्यांनी कारकुनी ते अगदी उच्चपदस्थ अधिकारीपदांपर्यंत वर्चस्व सिद्ध केले आहे. बदलत्या काळात टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यामुळे या संस्था अखेरच्या घटका मोजत आहेत.

या संस्थांच्या राज्यस्तरावरील संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे अनेकदा निवेदने, विनंती अर्ज दिले; पण दखल घेण्यात आलेली नाही. माणगाव तालुक्‍यातील वैश्वानर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटचे चालक दिलीप मोने यांनी ‘सकाळ’कडे आपली व्यथा मांडली. ‘इन्स्टिट्यूट बंद झाल्यास मी या उतारवयात करणार काय? माझा उदरनिर्वाह कसा होणार?’, असा चिंतेचा सूर त्यांनी लावला. इतरही प्रश्‍न उपस्थित केले. टाईपरायटिंगचे प्रशिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांची प्रचंड इच्छाशक्ती असताना सरकार या प्रशिक्षणाच्या धोरणाविरुद्ध कसे काय पाऊल उचलते, असा सवाल त्यांनी केला. 

सरकारचा ठेंगा 
सरकारच्या निर्णयाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी संस्थाचालकांचे शिष्टमंडळ अनेक वेळा मंत्रालयात गेले; मात्र त्यांना मंत्री महोदयांनी ठेंगा दाखवला. सरकारचे धोरण असेच राहिल्यास या सर्वच संस्थाचालकांवर उपासमारीची वेळ येईल, असे दिलीप मोने म्हणाले.

Web Title: Typing Institute of hunger owner on the way