फडणवीस यांच्यासोबत गुप्त बैठकीबाबत उदय सामंत यांचा खुलासा

200 लोकांसमोर गुप्त बैठक होत नाही
फडणवीस यांच्यासोबत गुप्त बैठकीबाबत उदय सामंत यांचा खुलासा

रत्नागिरी : गुप्त बैठक करायची असल्यास ती अनेक ठिकाणाहून करता येते. त्यासाठी नागपूर, मुंबई, पुणे ही ठिकाणे आहेत. बंद खोलीआड चर्चा करायची आवश्यकता नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांच्या सोबतची भेट गुप्त नव्हती, अशी प्रतिक्रीया पालकमंत्री उदय सामंत (uday samant) यांनी दिली. आज रत्नागिरीत (ratnagiri) ते बोलत होते. काल (सोमवार) निलेश राणे (nilesh rane) यांनी केलेल्या ट्वीट संर्दभात त्यांनी खुलासा केला. यामध्ये निलेश राणे यांनी म्हटंले होते, राज्याचे विरोधी पक्षनेते रत्नागिरी दौऱ्यावर असताना उदय सामंत त्यांना येऊन गुपचुप भेटतात. बंद दाराआड चर्चा होते. उदय सामंत यांचे सगळे विषय टेंडरचे असतात असा आरोप त्यांनी केला होता.

यावर उदय सामंत यांनी प्रतिक्रीया दिली, ते म्हणाले, 200 लोकांसमोर गुप्त बैठक होत नाही. गुप्त बैठक करायची असेल तर ती मतदार संघात करेन. विरोधाकांच्या आरोपांची दखल मी का घ्यावी. देवेंद्र फडणवीस यांच्याशी सहा दिवसांपूर्वी बैठक झाली आहे, ती गुप्त नव्हती. राणेंची दखल जनतेन घेतली नाही, त्यांच्या आरोपांची दखल मी का घ्यावी? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

फडणवीस यांच्यासोबत गुप्त बैठकीबाबत उदय सामंत यांचा खुलासा
काय सांगता! चक्क रत्नागिरीत आढळला पांढरा कावळा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com