आमदार सदानंद चव्हाण हॅट्ट्रिक करणार - उदय सामंत

मुझफ्फर खान
सोमवार, 24 सप्टेंबर 2018

चिपळूण - आमदार सदानंद चव्हाण यांचा जनसंपर्क आणि कामाचा आवाका जिल्ह्यातील पाचही आमदारांमध्ये सर्वाधिक असल्याने ते विजयाची हॅट्ट्रिक साधतील. चिपळूणचा पुढचा आमदार शिवसेनेचाच असेल, असा विश्‍वास शिवसेना उपनेते व म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी येथे व्यक्त केला. 

आमदार चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त बहादूरशेखनाका येथील स्वामी मंगल सभागृहात संगमेश्‍वरसह चिपळूण तालुक्‍यातील कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी ते म्हणाले की, चव्हाण यांचा मतदारसंघातील जनसंपर्क हा वाखाणण्याजोगा असल्याने त्यांना निवडणुकीची चिंता नाही. त्यांना नेहमी जिंकायची सवय आहे, तर त्यांच्यासमोर येणाऱ्या मातब्बरांना नेहमी हरण्याची सवय आहे. रत्नागिरीतूनही कुणीतरी येथे येण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र तेही अवघ्या 19 मतांच्या निवडणुकीतही हरतात. त्यांनाही नेहमी हरण्याची सवय असल्याने चिंता करण्याचे कारण नाही. मात्र कार्यकर्त्यांनी गाफील राहता कामा नये. वाढदिवस कार्यक्रम हा संकल्प दिन म्हणून साजरा करा.

आमदार चव्हाण यांचे काम आपण गेली अनेक वर्षे पाहत असल्याने ते तीस हजारांच्या मताधिक्‍क्‍याने निवडून येतील यात शंकाच नाही. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आगामी निवडणुकीत शिवसेनेचे आमदार जास्तीत जास्त निवडून जाणे गरजेचे असल्याचे सांगत सामंत यांनी आमदार चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी पालकमंत्री रवींद्र माने, माजी आमदार सुभाष बने, सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख सचिन कदम, विलास चाळके, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संतोष थेराडे यांनी आमदार चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करतानाच त्यांच्या विजयाच्या हॅट्ट्रिकसाठी सर्वांनी कामाला लागा असे आवाहन केले. 

Web Title: Uday Samant comment