पालकमंत्री बनलो तर बचत गटांच्या विक्री केंद्राला प्राधान्य - उदय सामंत

पालकमंत्री बनलो तर बचत गटांच्या विक्री केंद्राला प्राधान्य - उदय सामंत

रत्नागिरी - बचत गटांच्या विक्री केंद्रासाठी जागा मिळाली, तर नाविन्य पूर्णमधून त्याला निधी देता येईल. हे काम पालकमंत्र्यांचे असले तरीही मी नियोजन सदस्य असल्याने ते पूर्ण करेन. कदाचीत मला पालकमंत्री बनण्याची संधी मिळाली तर, हे काम प्राधान्याने करुन देईन, असा विश्‍वास व्यक्त करित म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी पालकमंत्री बनण्याची इच्छा पुन्हा मांडली.

शहरातील मराठा मैदानावर आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले की, रत्नागिरी पालिकेत अनेक नगराध्यक्ष होऊन गेले, त्यांची कामे पाहीली; मात्र महिलांसाठी प्रामाणिक काम करण्याचा प्रयत्न राहूल पंडित यांनीच केला. प्रत्येक घटकाला समोर ठेवून ते काम करित आहेत. दिव्यांगाना त्यांनी मदत केली. पाणी, रस्ते, कचरा यापलीकडे जाऊन काहीतरी करता येते हे त्यांनी दाखवून दिले. राहुलजी तुम्ही चांगलं काम केल तरी टीका होणार. पण जनताच त्याला उत्तर देईल.

प्रत्येक महिलेला कर्ज देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आधार दिला आहे. बचत गटांना पैसे दिले, मात्र त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी विक्री केंद्र पाहिले. त्यासाठी पालिकेचे शहरात पडून असलेले गाळे त्यांना उपलब्ध करुन दिले पाहीजेत. त्यासाठी जिल्हाधिकारी, नगराध्यक्ष यांनी प्रयत्न करावेत. त्यापुढे जाऊन कायमस्वरुपी विक्री केंद्र उभारण्यासाठी जागा मिळाली तर नाविन्य पूर्णमधून त्याला निधी देता येऊ शकतो. ते काम पालकमंत्र्यांचे आहे. पण मी नियोजन समितीचा सदस्य आहे, जिल्हाधिकारी सदस्य सचिव आहेत. त्यांच्यामार्फत हे होऊ शकते. कदाचीत मला पालकमंत्री बनण्याची संधी मिळाली तर हे काम मी प्राधान्याने करुन देईन, असा विश्‍वास व्यक्त केला.

महिलांना निधीसाठी वेगळे हेड असावे - सामंत

जिल्हा नियोजनमधून विविध हेडखाली निधी दिला जातो; परंतु महिलांसाठी वेगळे हेड ठेवलेले नाही. त्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाने प्रस्ताव तयार करावा. तो मुख्यमंत्र्यांकडे मांडू, आणि निर्णय करुन घेऊ. त्यात यश मिळाले तर महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा विश्‍वास आमदार सामंत यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com