उद्धव ठाकरे म्हणाले, सावंतवाडीचा राजवाडा पाहण्यासाठी पुन्हा येणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

सावंतवाडीचे सौंदर्य हे राजवाड्यात दडलय. त्यामुळे आतून राजवाडा बघण्याची इच्छा आहे. पुढच्यावेळी मी नक्की राजवाड्यात येईन. शिवरामराजेंचे स्मारक होत आहे. हे ऐकून आनंद झाला, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

सावंतवाडी - सावंतवाडीचे सौंदर्य हे राजवाड्यात दडलय. त्यामुळे आतून राजवाडा बघण्याची इच्छा आहे. पुढच्यावेळी मी नक्की राजवाड्यात येईन. शिवरामराजेंचे स्मारक होत आहे. हे ऐकून आनंद झाला, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. ठाकरे यांनी सावंतवाडीतील जाहीर सभा झाल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा सावंतवाडीच्या राजवाड्याला भेट दिली. युवराज लखमराजे भोसले यांनी त्यांचे स्वागत केले.

Vidhan Sabha 2019 : कणकवलीतील ती सभा राणेंची अन् कौतुक मात्र माझे - दीपक केसरकर 

यावेळी तेजस ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, अरूण दुधवडकर, संदेश पारकर, वसंत केसरकर उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, ‘‘मला बरेच दिवस राजवाड्याला भेट देण्याची इच्छा होती; पण वेळ मिळत नव्हता. आज हा योगायोग जळून आला; मात्र रात्रीची वेळ असल्याने राजवाडा आतून बघता येणार नाही. मी पुन्हा कधीतरी दिवसा येईन तेव्हा नक्कीच राजवाड्याला आतून भेट देईन.’’ या वेळी ठाकरे यांनी शिवराम राजेंची आठवण काढली. त्यांचे स्मारक राज्य सरकारच्या माध्यमातून होत आहे हे ऐकून आनंद झाल्याचे सांगितले.

लखम भोसले यांनी राजवाड्याची माहिती ठाकरे यांना दिली. तसेच राजवाड्यात गंजिफाचे काम सुरू असल्याचे सांगितले. आजही लाकडी कलाकुसर आम्ही जिवंत ठेवली आहे. यापुढे ही जिवंत ठेवू, असेही त्यांनी स्पष्ट केले. वसंत केसरकर यांनी ही लखम भोसले यांच्याबाबत ठाकरे यांना माहिती दिली. मंत्री दीपक केसरकर यांनी शिवरामराजेंच्या स्मारकासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्याचे लखम भोसले म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uddhav Thackeray wants to see Sawantwadi Palace