रत्नागिरीतील अल्ट्राटेक सिमेंटचे कार्यालय सील; तहसीलदारांचे आदेश

कार्यवाहीत अडथळा आणल्यास संबंधितांवर शासकीय कामात अडथळा आणल्याबाबत गुन्हा दाखल होणार
shop sealed
shop sealedshop sealed
Summary

कार्यवाहीत अडथळा आणल्यास संबंधितांवर शासकीय कामात अडथळा आणल्याबाबत गुन्हा दाखल होणार

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील अल्ट्राटेक सिमेंट या कंपनीला मिऱ्या येथील जमीन महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांनी भाडेपट्ट्यांनी दिली आहे. सदर जमिनीचा कंपनी औद्योगिक वापर करत असल्याने आणि वापरास कोणतीही पूर्व परवानगी घेतली नसल्याने तहसीलदार रत्नागिरी यांनी याबाबत कंपनीस नोटीस देऊन खुलासा मागवला, सदर खुलासा समाधानकारक नसल्याने सन 1981 पासून अनधिकृत बिनशेती वापर करत असल्याने कंपनीस रक्कम रुपये 8,55,685/- इतका दंडाचा आदेश करण्यात आला आहे.

shop sealed
मोठी बातमी! वाझे-परमबीर सिंग यांच्या भेटीवर चौकशीचे आदेश

सदर दंड भरणेबाबत कंपनीस दोन नोटीसा देण्यात आलेल्या होत्या. तथापि आज अखेर कंपनी दंडाची रक्कम भरलेली नाही. कंपनीने दोन दिवसात दंडाची रक्कम न भरल्यास 2 डिसेंबर रोजी झाडगाव येथील कंपनीच्या कार्यालयातील मनुष्यबळ विभाग (HR SECTION) सील करण्याचे लेखी आदेश तहसीलदार रत्नागिरी यांनी दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या निवासी नायब तहसीलदार व मंडळ अधिकारी रत्नागिरी यांना प्राधिकृत करण्यात आले आहेत. या कार्यवाहीत कोणताही अडथळा आणल्यास संबंधितांवर शासकीय कामात अडथळा आणल्याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश तहसीलदार शशिकांत जाधव यांनी दिले आहेत.

shop sealed
भारतीयांच्या प्रतिभेचा अमेरिकेला मिळतोय फायदा; एलन मस्क यांचे ट्विट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com