रत्नागिरी: खाडीपट्ट्यात अनधिकृत वाळू उपसा 

Unauthorized sand extraction in ratnagiri
Unauthorized sand extraction in ratnagiri

दाभोळ - दापोली तालुक्‍यातील उन्हवरे परिसरातील खाडीपट्ट्यात मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे वाळूचा उपसा करण्यात येत असून यामुळे शासनाच्या महसुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याकडे दापोलीच्या महसूल विभागाकडून डोळेझाक केल्याने वाळू व्यावसायिकांचे फावले आहे.

वाळू आणून ती क्रेनच्या साहाय्याने किनाऱ्यावर उतरवण्यासाठी बार्ज लावावा लागतो. तो लावण्यासाठी जेटीही उभारली आहे. या जेटीवर वाळू उतरवून दापोली तालुक्‍यातील उन्हवरे गोविंदशेत, पांगारी, शिरवणे यांसह याच भागात पाच ते सहा ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जातो. काही ठिकाणी दाभोळ खाडीतून बार्जमधून वाळू आणून ती क्रेनच्या साहाय्याने किनाऱ्यावर उतरवली जाते. ही बार्ज लावण्यासाठी जेटीही उभारली आहे. या जेटीवर वाळू उतरवून ती डंपरमध्ये भरून तिचा पुरवठा दापोली तालुक्‍यात केला जात असून रात्रंदिवस होणाऱ्या या बेकायदा वाळू वाहतुकीकडे महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्‍त केली जात आहे.

खेड तालुक्‍यातील कर्जी येथूनही दापोली तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळू वाहतूक होत असून शनिवार, रविवार व अन्य शासकीय सुट्टीच्या दिवशी महसूल विभागाचे अधिकारी सुट्टीवर असल्याचा फायदा घेऊन दिवसरात्र वाळूचा उपसा करून त्याची बेकायदा वाहतूक केली जात आहे. महसूल विभागाने बेकायदा वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी भरारी पथके निर्माण केली असून बेकायदा वाळू वाहतूक होत असताना या भरारी पथकातील अधिकारी असतात तरी कोठे? असा प्रश्‍नही नागरिकांकडून विचारला जात आहे.    

संपादन - धनाजी सुर्वे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com