तीन वाहनांच्या धडकेत मामा-भाची ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

मंडणगड : मुंबई-गोवा महामार्गावर गोरेगावमधील लोणेरे (जि. रायगड) येथील रेपोली फाट्यावर एसटी-मोटार आणि ट्रेलरच्या अपघातात म्हाप्रळ मोहल्ला येथील मामा-भाची जागीच ठार झाले. हा अपघात बुधवारी (ता. 13) सकाळी साडेआठच्या सुमारास झाला. हुसैन बकाबू मुकादम (वय 70) व आयशा मुकादम (54) अशी मृतांची नावे आहेत. कृषीद अब्दुला मुकादम (80) गंभीर जखमी झाल्या आहेत.
 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : हुसैन बकाबू आज सकाळी मोटारीने (एमएच-08-आर-2509) माणगाव येथून म्हाप्रळला येत होते. लोणेरे येथील रेपोली फाट्यादरम्यान पुढील वाहनाला बाजू काढत असताना समोरून येणाऱ्या दापोली-मुंबई बसवर (एमएच-20-बीएल-3267) मोटार आदळली. त्याचवेळी मोटारीच्या मागून येणाऱ्या ट्रेलरची (एमएच-06-एक्‍यू-7553) मोटारीला धडक बसल्याने अपघाताची तीव्रता आणखी वाढली. एसटी आणि ट्रेलरच्या मध्ये मोटार सापडल्याने तिच्या पुढील बाजूचा चक्काचूर झाला. अपघातात मोटारीतील हुसैन मुकादम व आयशा मुकादम यांचा जागीच मृत्यू झाला. मुकादम (80) गंभीर जखमी झाल्या. गोरेगाव पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद आहे. पोलिस उपनिरीक्षक पराग लोंढे तपास करीत आहेत. दरम्यान, हुसैन मुकादम आणि आयशा मुकादम यांचे मृतदेह सायंकाळी म्हाप्रळ येथे आणण्यात आले आहेत. त्यांच्यावर गुरुवारी (ता 14) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Web Title: Uncle-niece killed three vehicles collided