मुरादपूर गावाची एकजुट यशाचा मार्ग दाखवणारी : पोलीस निरीक्षक पाटील

प्रमोद हर्डीकर
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

साडवली : देवरुखजवळील मुरादपुर गावाने एकत्र येऊन गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत गावचा एकोपा दाखवला. डीजेच्या काळात पारंपरिक वाद्यांचा वापर केला. शाहीर आबा खेडेकर यांनी या पिढीला मार्गदर्शन केले अशा आशयाचे वृत्त साडवली बातमीदार प्रमोद हर्डीकर यांनी दिले होते. या वृत्ताची दखल डाॅ.प्रवीण मुंढे, पोलिस अधिक्षक, रत्नागिरी यांनी घेतली व शाहीर आबा खेडेकर यांना पोलिसदला तर्फे सन्मानपत्र देऊन गौरवले.

मुरादपुर येथील राधा कृष्ण मंदिरात मुरादपुर ग्रामस्थ व शाहीर आबा खेडेकर यांना गौरवण्यात आले. यावेळी देवरुख पोलिस स्थानकाचे पोलीस निरीक्षक शिवाजी पाटील, संगमेश्वर तहसीलदार संदीप कदम, सरपंच सिद्घि बांडागळे, शाहीर आबा खेडेकर, कलगीतुरा उन्नती मंडळाचे शांताराम मालप, बापु चव्हाण, अप्पा शिंदे, प्रमोद हर्डीकर, अनिल मोरे, प्रशांत मिशिंदे, किशोर जोयशी, संदीप बांडागळे आदींसह पोलिस स्टाफ, महसूल कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी पोलीस निरीक्षक शिवाजी पाटील यांनी दै.सकाळने मुरादपुरचे वृत्त प्रसिद्घ केले आणि मुंढे साहेबांनी या गावाचा आदर्श इतर गावांनी घ्यावा व शाहीर आबा खेडेकर यांची प्रेरणा गावांनी घ्यावी म्हणुन पोलीस दलातर्फे हा गावाचा व आबांचा सन्मान आम्ही करत आहोत असे नमुद केले. गावात शातंता आणि एकोपा असल्याने या गावाने अनेक पुरस्कार मिळवले आहेत. तसेच या गावातून एकही तक्रार नाही हे विशेष असल्याचे सांगत आजकाल शुल्लक कारणावरुन लोक पोलीस स्टेशनला येत असतात याची अनेक उदाहरणे पाटील यांनी सांगितली.

तहसीलदार संदीप कदम यांनी मुरादपुरची संस्कृती ही वारकरी पंथांची असल्याने चांगले तेच या गावाने दिले आहे. या गावात आबा खेडेकर यांच्या मार्गदर्शनात नवी पिढी घडते आहे यामुळे भविष्यात मुरादपुर हे गाव अधिक यशदायी होणार आहे असे सांगत शासनाचा मतदार नोंदणीचा कार्यक्रम व माहीती दिली. बबन बांडागळे यांनी आबा खेडेकर यांचा कलाकार म्हणून जीवनपट उलगडला.शांताराम मालप यांनी शाहीरांचे कार्य जनतेसाठी प्रेरक असुन सध्या जाकडी नृत्यातून जी अश्लील भाषा वापरली जात आहे ती थांबली पाहीजे असे मत व्यक्त केले.

Web Title: unity of muradpur village is way to success said police officer patil