लहान वयातच अभिरुची जागवा - सुरेश ठाकूर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 डिसेंबर 2016

सावंतवाडी - ‘‘विद्यार्थी साहित्य संमेलन हा उपक्रम आदर्श विद्यार्थी व राष्ट्र घडविणारा आहे. ज्या लहान वयात अभिरुचीला जागृत करायला हवे, ते वय विद्यार्थी दशेतच असते, अशा बालसाहित्य व्यासपीठावरून उद्याचे महान साहित्यिक निर्माण होतील’’, असे मत कोलगाव येथे निरामयच्या चौथ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी व्यक्त केले.

कोलगाव निरामय केंद्राच्या सांस्कृतिक सभागृहात चौथे विद्यार्थी साहित्य संमेलन रविवारी (ता २५) झाले. या वेळी संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. व्यासपीठावर विद्यार्थी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी विठ्ठल कदम, कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष भरत गावडे, निरामय केंद्राच्या अध्यक्षा डॉ. शालिनी सबनीस, कार्यवाह वंदना करंबळेकर, विनोबा भावे हायस्कूलचे मुख्याध्यापक भरत सराफदार, प्रसाद घाणेकर आदी उपस्थित होते. उद्‌घाटन डॉ. सबनीस यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या पूर्वाधात निरामय केंद्राच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त गृहलक्ष्मी पुरस्कार व आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार केंद्राच्या अध्यक्षा डॉ. सबनीस यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. त्यानंतर आयोजित केलेल्या पाककला, चित्रकला, कथाकथन व रांगोळी स्पर्धाच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. साहित्य संमेलनाच्या प्रारंभी ग्रंथदिंडी व ग्रंथ प्रदर्शनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. सुरवातीला जिल्हा परिषद कुणकेरी शाळा क्रमांक १ च्या विद्यार्थ्यांनी साने गरुजीच्या जीवनपटावर आधारित संगीत कार्यक्रम सादर करून मान्यवरांची मने जिंकली. या वेळी प्राध्यापक मिलिंद भोसले, किशोर वालावलकर, रामचंद्र वालावलकर, बाबली चिले, एकनाथ कांबळे, मनोहर परब, संजीव मोहिते, भीमराव शेडगे, गोविंद सारंग, रश्‍मी वाडकर, अस्मिता कासार आदी तसेच विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Web Title: Unlock your palate a very young age