भाजपच्या राज्यात महिला असुरक्षित - चित्रा वाघ

भाजपच्या राज्यात महिला असुरक्षित - चित्रा वाघ

सावर्डे - महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे योगदान आहे. महिलांनी ते विसरता कामा नये. आघाडी सरकारच्या काळात महिलांना सन्मान मिळत होता. केंद्रात आणि राज्यात भाजप-सेनाप्रणीत महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर परिस्थिती बदलली. या राज्यात महिला सुरक्षित नाहीत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत केला. 

वाघ म्हणाल्या की, आघाडी काळात ग्रामीण भागात महाराष्ट्र नंबर एक होता. आता तो नवव्या क्रमांकावर फेकला गेला. एनसीआरटीच्या अहवाल सांगतो की, महिलांवर अत्याचारात महाराष्ट्र बिहार, उत्तर प्रदेशच्या बरोबरीने आहे. भांबुर्डीचा भयानक प्रकार घडतो, तर भिलवडी, पुणे येथील एन्फोसिस येथील ताज्या घटनेमुळे महिला सुरक्षित नाहीत हेच दिसून येते.

एकीकडे मुलींना जन्म द्या सांगायचे व त्यांच्यावरच अत्याचार करायचे. यामुळे कोणत्याच बाईची आज मुलीला जन्म देण्याची मानसिकता नाही. बेटी बचाओ, बेटी बढाओ आणि सेल्फी काढून मुलींची संख्या वाढणार नाही. 
कोपर्डीसारख्या प्रकारानंतर मुख्यमंत्र्यांनी ३० दिवसांत आरोपपत्र दाखल होईल असे सांगितले; परंतु कार्यवाही झालेली नाही. त्यावर सुप्रियाताईंनी आरोपींवर तातडीने गुन्हा दाखल न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा दम दिल्यावर आरोपपत्र दाखल झाले. गुन्हेगार ताब्यात घेतले. सध्या जाती-जातीमध्ये तेढ वाढली आहे. सर्व समाज मोर्चे काढत रस्त्यावर उतरले आहेत. बेरोजगारी भेडसावत आहे. देशात वर्षाला केवळ १ लाख ३५ हजार रोजगारांची निर्मिती झाली. नोकर भरतीबाबत शासनाचा दृष्टिकोन उदासीन आहे. फडणवीस सरकारचा आश्‍वासने देऊन लोकांना भुलविणे हा एककलमी कार्यक्रम होऊन बसला आहे. अशा सरकारला हटविणे महत्त्वाचे आहे. आपल्या पक्षाची ध्येयधोरणे नेटवर्किंग वाढवून तळागाळापर्यंत पोहोचवून २०१९ ची विधानसभा जिंकू, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. 

इच्छुक जास्त ही नेत्यांची डोकेदुखी
राष्ट्रवादीला चांगले वातावरण आहे. राज्यभरात राष्ट्रवादीकडून लढण्यासाठी इच्छुकांची संख्या अफाट आहे. अनेक जिल्ह्यात तिकीटवाटप करताना डोकेदुखी बनत आहे. मात्र, आगामी निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी राज्यात सरस ठरेल, असा विश्‍वास वाघ यांनी व्यक्‍त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com