‘ऊर्जा’ पुस्तिका स्फूर्ती देणारी - वैभव खेडेकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

खेड - ‘सकाळ’तर्फे प्रसिद्ध करण्यात आलेली ‘ऊर्जा’ ही पुस्तिका समाजातील विविध स्तरातील बांधवांना नेहमीच ऊर्जा देणारी ठरेल, असे प्रतिपादन खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केले. या पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा शनिवारी (ता. १) सकाळी नगराध्यक्षांच्या दालनात झाला. 

‘सकाळ’तर्फे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. त्यातून समाजातील विविध स्तरातील नागरिकांना स्फूर्ती मिळते. यापुढे असेच कार्य आपल्या समूहातर्फे सुरू राहावे, असे खेडेकर यांनी सांगितले. या वेळी मुख्याधिकारी महादेव रोडगे, गटनेते अजय माने, पालिकेतील सर्व कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते. 

तालुका कृषी कार्यालय येथेही या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी तालुका कृषी अधिकारी सुरेश कांबळे, जगदीश शिंदे, नाना जोशी, अवी निकम, पारसनाथ बिरनाळे, एम. बी. जाधव, सी. बी. माड्याळ, श्रीमती नीलम गावंड, रूपाली कोळंबे, शीतल बुरांडे आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. खेड येथील समाजसेवी संस्था जेसीज्‌च्या कार्यालयात पुस्तिकेचे प्रकाशन झाले. याप्रसंगी खेड जेसीज्‌चे अध्यक्ष अमोल क्षीरसागर, अमोल दळवी, डॉ. विक्रांत पाटील, शशांक कदम, नीलेश काणेकर यांच्यासह जेसीज्‌चे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी ऊर्जा पुस्तिकेतून समाजातील प्रतिबिंब मांडण्याचा ‘सकाळ समूहा’चा प्रयत्न खरोखरच स्तुत्य आहे. पुस्तिकेतून तळागाळातील माणसाची एक वेगळी ओळख जनसामान्यांपर्यंत पोचेल. या उपक्रमाला आमच्या शुभेच्छा, अशा शब्दांत जेसीज्‌चे अध्यक्ष क्षीरसागर व पदाधिकाऱ्यांनी आपले मत व्यक्त केले.

Web Title: Urja Book that inspired 'energy'