रत्नागिरीत कापडी पिशवी जनजागृती फेरीला प्रतिसाद

रत्नागिरीत कापडी पिशवी जनजागृती फेरीला प्रतिसाद

रत्नागिरी - नागरिकांची प्लास्टिक पिशवी वापरण्याची सवय बदलण्याचा अनुलोमने सुरू केलेला उपक्रम स्तुत्य आहे. प्लास्टिक मुक्तीमध्ये महाविद्यालयीन तरुणांचा सहभाग अभिनंदनीय असून हा संदेश त्यांनी प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवावा. दुकानात गेल्यावर प्लास्टिकची पिशवी मागणार नाही, अशी शपथ घ्या, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले.

कापडी पिशवी वापरणे महत्त्वाचे असून त्याच्या जागृतीसाठी सोमवारी अनुलोम आणि स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था, ‘सकाळ मीडिया’ आणि अन्य सामाजिक संस्थांनी फेरी काढली. त्या वेळी श्री. चव्हाण बोलत होते. जयस्तंभ येथून फेरीला सुरवात झाली. रामआळी, गोखले नाकामार्गे लक्ष्मी चौक येथे सांगता करण्यात आली. या वेळी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, तहसीलदार मच्छिंद्र सुकटे, नगराध्यक्ष राहुल पंडित, मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्यासह अनुलोमचे भाग जनसेवक रवींद्र भोवड, उपविभागप्रमुख स्वप्नील सावंत उपस्थित होते.

नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी अनुलोमचे कौतुक केले. शहराचा देशात स्वच्छतेमध्ये 40 वा क्रमांक आला. अनुलोमच्या चळवळीला पालिका सहकार्य करेल, असे सांगितले. डॉ. मुंढे व श्री. सुकटे यांनीही अनुलोमचे अभिनंदन केले.

प्लास्टिकवर बंदी आली, पण पर्याय म्हणजे कापडी पिशवी वापरणे. सेल्फी विथ कापडी पिशवी सोशल मीडियावर दुसर्‍या टप्प्यात लोकांना आवाहन करून त्यांच्याकडून जुने कपडे, साड्या, शर्टपँट पिस सामाजिक संस्थांकडे जमा केले जातील. त्याच्या पिशव्या महिला बचत गटाकडून शिवून घेण्यात येतील. तिसर्‍या टप्प्यात या पिशव्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देण्यात येणार असून त्या ते गावात पोहोचवतील, अशी माहिती स्वप्नील सावंत यांनी दिली.

सहभागी संस्था

भारत शिक्षण मंडळ वरिष्ठ महाविद्यालय, गोगटे-जोगळेकर कॉलेज व नवनिर्माण कॉलेजमधील एनएसएस विभाग, यश नर्सिंग कॉलेज, लायनेस क्लब, स्वराज्य फाउंडेशन, आधार फाउंडेशन, जनजागृती संघ, जाणीव फाउंडेशन, भंडारी समाज, जय हो प्रतिष्ठान, भंडारी युवा प्रतिष्ठान, प्रयत्न प्रतिष्ठान, अनुलोमचे वस्तीमित्र संजय पाथरे, सचिन दुर्गवली, संजय भोरे, जितेंद्र शिवगण, वैदेही चव्हाण, मुकुंद जोशी, बिपिन शिवलकर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com