सोशल मिडियाचा वापर करा सांभाळून!     

pali
pali

पाली : भारतात दिवसेंदिवस इंटरनेटचा वापर करणार्‍याची संख्या वाढत आहे. या इंटरनेट द्वारे सोशल मिडियाचाही वापर वाढत चालला आहे. परंतू सोशल मिडियाचा योग्य वापर न केल्याने समाजात अनेक खोट्या बातम्या, हिंसा यांसारख्या गोष्टी घडत आहेत. यावर आळा घालण्यासाठी सोशल मिडियाचा वापर सांभाळून करण्याचे आवाहन शिवऋण प्रतिष्ठानच्या इंटरनेट व सोशल विभागाचे अध्यक्ष केतन म्हसके यांनी केले आहे.

आज देशात 20 कोटी लोकसंख्या व्हॉट्सअपचा वापर करत आहेत. तज्ञांच्या मतानुसार 2020 साली हिच संख्या 60 कोटी वर पोहचेल. दररोज व्हॉट्सअपवर 1300 करोड बातम्या येतात. यातील बहुतांश बातम्या खोट्या किंवा निराधार असतात. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी खोट्या बातम्यांमुळे माणसांचे जीव घेतले गेल्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासुन झाल्या आहेत.

परदेशात शिक्षा
जगातील फ्रान्स, मलेशिया सारख्या अनेक  देशांत अश्या खोट्या बातम्या पसरवणे गुन्हा असुन त्या बद्दल गुन्हेगारांना शिक्षा होते. भारतातही याचा धोका ओळखुन शासना मार्फत यासंबंधी पावले उचलली जात आहेत. या गुन्ह्यात तिन जणांचा समावेश होतो. संदेश पाठवणारा, इंटरनेट सुविधा पुरवणारा आणि संदेश वाचणारा यामुळे आपण जर असे संदेश पुढे पाठवत असाल तर सावधान ! खोटी बातमी पसरवणे व समाजामध्ये दहशत पसरवणे हा एक संसर्गजन्य रोग आहे. तो तुम्हालाही होऊ शकतो किंवा आपण हि याची शिकार होऊ शकता.

त्यामुळे आपल्याला आलेला संदेशाची खातर जमा करुनच तो पुढे पाठवा किंवा अश्या बातम्यां कडे लक्ष देऊ नका. कधी कधी संदेश आपल्या जवळच्या माणसाकडुन आलेला असतो. त्यामुळे आपण त्यावर लगेच विश्वास ठेऊन पुढे पाठवतो. पण संदेश पुढे पाठवण्याची घाई करु नका जरा थंबा त्याची सत्यता पडताळा. अन्यथा आपणही एखाद्या मोठ्या गुन्ह्याचा नकळत भाग व्हाल. अशी माहिती शिवऋण प्रतिष्ठाणने सकाळला दिली.

कमी किंमतीमध्ये भरपूर मिळणारा डेटा. स्मार्ट फोन मध्ये सहज उपलब्ध असणारा कॅमेरा आणि कोणत्याही व्हिडिओ व फोटोत बदल करता येणारे आणि फुकटात मिळणारे सॉफ्टवेअर व ऍप्स यामुळे काही समाजकंटकां मार्फत सोशल मिडियाचा गैरवापर होत आहे.  तरी त्याचा वापर आपण प्रत्येकाने सजगतेने करावा 
- केतन म्हसके, शिवऋण प्रतिष्ठाण उपाध्यक्ष आणि इंटरनेट व सोशल मिडिया प्रमुख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com