विकासासाठी रत्नागिरी रिफायनरीला पाठींबा द्या - व्ही. के. रायजादा

राजेंद्र बाईत
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

राजापूर - पानिपत रिफायनरी आणि इंडीयन ऑईलमुळे त्या भागाचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आदी स्वरूपामध्ये सर्वांगीण विकास झाला आहे. अशा स्वरूपाचा विकास रत्नागिरी रिफायनरीमुळेही या भागात होईल, असा विश्वास पानिपत रिफायनरी प्रकल्पाचे एक्‍झुकेटीव्ह डायरेक्‍टर व्ही. के. रायजादा यांनी व्यक्त केला.  

राजापूर - पानिपत रिफायनरी आणि इंडीयन ऑईलमुळे त्या भागाचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आदी स्वरूपामध्ये सर्वांगीण विकास झाला आहे. अशा स्वरूपाचा विकास रत्नागिरी रिफायनरीमुळेही या भागात होईल, असा विश्वास पानिपत रिफायनरी प्रकल्पाचे एक्‍झुकेटीव्ह डायरेक्‍टर व्ही. के. रायजादा यांनी व्यक्त केला.  

तालुक्‍यातील नाणार येथे इंडीयन ऑईल कंपनीच्या माध्यमातून रत्नागिरी रिफायनरीची उभारणी केली जात आहे. त्या अनुषंगाने येथील पानिपत रिफायनरी प्रकल्पाच्यावतीने ग्रामस्थ व पत्रकारांच्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री रायजादा बोलत होते. 

इंडियन ऑईल कंपनीच्या माध्यमातून नाणार येथे उभारल्या जात असलेल्या प्रकल्पामुळे या परिसराचा विकासात्मक कायापालट होईल. यासाठी ग्रामस्थांनी साथ द्यावी. 

-  व्ही. के. रायजादा

यावेळी त्यांनी पानिपत रिफायनरी आणि इंडीयन ऑईल कंपनीच्या माध्यमातून झालेल्या विकासाचा लेखाजोखा मांडला. 

श्री. रायजादा म्हणाले, 1998 मध्ये उभारण्यात आलेल्या पानिपत रिफायनरीसाठी सुमारे 4 हजार 200 एकर क्षेत्र जमीन संपादीत करण्यात आली असून त्यापैकी 60 टक्के क्षेत्रामध्ये प्रकल्पाची उभारणी तर, 40 टक्के क्षेत्रामध्यो ग्रीन झोनची उभारणी करण्यात आली आहे. सुमारे 2 हजार 200 कर्मचारी या प्रकल्पामध्ये कार्यरत असून सहा हजार आऊटसोर्सिंग कर्मचारी असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला देताना त्यांचे दर्जेदार पद्धतीने पुनर्वसन करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी रिफायनरीसह इंडीयन ऑईल कंपनीच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. यावेळी अभ्यासदौऱ्यातील सहभागी ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्‍नांसह शंकाचे त्यांनी समर्पक उत्तरे देत निरसन केले. यावेली इंडीयन ऑईल कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. 

रिफायनरीला गतवर्षी "डायमंड' पुरस्कार

इंडियन ऑईल कंपनीने सीएसआर फंडातून प्रकल्पग्रस्त गावांसह त्या परिसरातील गावांच्या विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. या गावांमध्ये भौतिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करून देताना स्थानिकांना या प्रकल्पासह अन्य ठिकाणी रोजगार मिळावा म्हणून कौशल्यधारीत रोजगारविषक प्रशिक्षण शिबिरांचेही वेळोवेळी आयोजन केले. त्यातच, लोकांच्या सदृढ आरोग्यासाठी मोफत आरोग्य शिबिरांचेही आयोजन करून सामाजिक बांधिलकी जोपासली. त्याची दखल हरियाणा शासनाने घेताना पानिपत रिफायनरीला गतवर्षी "डायमंड' पुरस्कार मिळाल्याचे व्ही. के.रायजादा यांनी सांगितले. 

प्रदुषण पातळी समजण्यासाठी गावात अॅनेलायझर

रिफायनरीमुळे निर्माण होणारे संभाव्य प्रदूूषण आटोक्‍यात राहण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते. त्यातच, ग्रामस्थांना प्रदूषणाची पातळी समजावी म्हणून प्रकल्पग्रस्त गावांसह लगतच्या गावांमध्ये अॅनेलायझर बसविण्यात आले आहेत. त्यातच, सल्फर रिकव्हरी युनिट बसविण्यात आल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

Web Title: V K Rayjada comment