डाटा ऑपरेटरचे प्रश्‍न सोडवू - वैभव नाईक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

कुडाळ - ग्रामपंचायत डाटा ऑपरेटरचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निश्‍चितच प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी दिली. यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊन मागणी करणार आहे असे सांगितले.

कुडाळ - ग्रामपंचायत डाटा ऑपरेटरचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निश्‍चितच प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी दिली. यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊन मागणी करणार आहे असे सांगितले.

जिल्ह्यातील ग्रामपंचायत डाटा ऑपरेटर यांच्या शिष्टमंडळाने ग्रामपंचायत डाटा ऑपरेटर यांचे मानधन ग्रामपंचायतीकडून मिळावे व ग्रामपंचायतींना अधिकार देऊन त्यांना कायम करण्याचा अधिकार द्यावेत. तोपर्यंत ग्रामपंचायतींकडून 14 व्या वित्त आयोगाचे डाटा एंट्री ऑपरेटरचे चेकवर सरपंचांनी सह्या देऊ नये, अशी मागणी करत संबंधित कंपनीकडून मिळणारे अल्प मानधन आम्हाला चार पाच महिने उशिरा मिळते; परंतु आम्ही संघटीत होऊन न्याय मागण्याचा प्रयत्न केला तर आमच्यावर दबाव आणून काढून टाकण्याची भाषा केली जाते, अशी व्यथा त्यांनी मांडली.

यावर श्री. नाईक म्हणाले, "" तुमच्या प्रश्‍नाबाबत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊन मागणी करणार आहे. येथील लोकांना न्याय देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत याच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील. एजन्सी जर तुमच्या संघटना मोडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांचा समाचार आम्ही घेऊ.''

यावेळी सभापती राजन जाधव, माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, आदुर्ले माजी सरपंच संतोष पाटील, माजी उपसभापती बबन बोभाटे, सरपंच जिल्हा समन्वय डॉ. प्रवीण सावंत, हुमरस सरपंच अनुप नाईक, चेंदवन सरपंच उत्तरा धुरी, सरपंच समीर म्हादगुत, सरपंच नाईक, पावशी सरपंच बाळा कोरगावकर, सरपंच समीर कदम, मांडकुली सरपंच तुषार सामंत, उपसरपंच दीपक आंगणे, हुमरमाळा उपसरपंच सामंत, पाट उपसरपंच श्री. राऊळ यावेळी उपस्थित होते.

Web Title: Vaibhav Naik Comment