रांगणागडाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध - वैभव नाईक

रांगणागडाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध - वैभव नाईक

कुडाळ - पर्यटकांना खुणावणाऱ्या ऐतिहासिक रांगणागडाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी गडाच्या पायथ्याशी करण्यात आलेल्या सुशोभीकरणाच्या पाहणीप्रसंगी दिली. 

खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून रागणागडाच्या पायथ्याशी पर्यटननिधी अंतर्गत सुविधांसाठी 40 लाख रुपये मंजूर झाले आहेत. हा निधी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे. या गडाच्या पायथ्याशी विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्याची पाहणी आमदार नाईक यांनी केली. ते म्हणाले, येथील महिला बचत गटाच्या माध्यमातून पर्यटकांना येथील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता यावा, या दृष्टीकोनातून प्रयत्न करणार आहोत. एकूणच गडाच्या सर्वांगीण विकासासाठी पर्यटक याकडे वळावेत, यासाठी आवश्‍यक त्या सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहे.''

यावेळी जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब, सभापती राजन जाधव, युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाठ, तालुकाप्रमुख राजन नाईक, उपवनसंरक्षक समाधान चव्हाण, संदीप महाडेश्वर, राजू जांभेकर, वेताळबांबर्डे उपविभागप्रमुख नरेंद्र राणे, मुकुंद सरनोबत, बाजीराव झेंडे, मोहन परब, स्नेहा नारकर, सतीश कुडाळकर, आबा तळेकर, राजा तेली, नाना सरनोबत, वनपाल पेंडुरकर, कडावल वनपाल आप्पा चव्हाण, हिर्लोक, नारूर येथील ग्रामस्थ, शिवसैनिक आदी उपस्थित होते. गडाच्या पायथ्याच्या जाण्यापूर्वी आमदार नाईक यांनी जागृत देवस्थान श्री देवी महालक्ष्मीचे दर्शन घेतले. 

निवासी व न्याहारी अंतर्गत विविध उपक्रम 

पर्यटनदृष्ट्या रांगणागडाकडे कित्येक पर्यटक याठिकाणी भेट देत आहेत. त्यांना याठिकाणी विविध सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी निवासी व न्याहारी योजना अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत, असेही नाईक यांनी स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com