esakal | चिपळूणातील 'हा' पुल वाहतूकीसाठी बंद
sakal

बोलून बातमी शोधा

vashishti river bridge temporarily closed caused heavy rain in ratnagiri

राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहतूक करणार्‍या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत

चिपळूणातील 'हा' पुल वाहतूकीसाठी बंद

sakal_logo
By
मुझफ्फर खान

चिपळूण : वाशिष्ठी नदीला पूर आल्यामुळे बहादूरशेख नाका येथील वाशिष्ठी पुल शनिवारी रात्रीपासून वाहतूकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे मुंबई गोवा आणि गुहागर - विजापूर राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहतूक करणार्‍या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. दोन्ही मार्ग एकेरी वाहतूक सुरू आहे. 

हेही वाचा - रत्नागिरीत नौका उलटून एका खलाशाचा मृत्यू, एक बेपत्ता..

शनिवारी चिपळूण परिसरात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे वाशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. चिपळूण शहरातही पाणी भरले. मुंबई-गोवा महामार्गावरील बहादूरशेख नाका येथील वाशिष्ठी पुल हा ब्रिटीशकालीन आहे. तो वाहतूकीसाठी अत्यंत धोकादायक आहे. नव्या पुलाचे काम अद्याप झालेले नाही. त्यामुळे जुन्या पुलावरूनच वाहतूक सुरू आहे. हा पुल वाहतूकीसाठी कायमचा बंद करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे पर्याय नसल्यामुळे जून्या पुलावरूनच वाहतूक सुरू आहे. 

हेही वाचा - कोकणात विषेश रेल्वे का आली रिकामी ? 

मात्र ज्यावेळी वाशिष्ठी नदीला जास्त पाणी येते त्यावेळी या पुलावरून होणारी वाहतूक थांबवली जाते. शनिवारी वाशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर रात्री या पुलावरील अवजड वाहतूक थांबवण्यात आली. त्यामुळे बहादूरशेख नाका, खेर्डी, कळंबस्ते, कापसाळ, कामथे आणि चिपळूण शहरातील महामार्गावर अवजड वाहने एका बाजूने थांबवण्यात आली होती. महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्‍न निर्माण झाला नाही.

संपादन - स्नेहल कदम 

loading image
go to top