अन् उमटले निराधार मुलांच्या चेहर्‍यावर हास्य...

vastly NGO make smile on orphan children
vastly NGO make smile on orphan children

राजापूर (रत्नागिरी) : गेल्या सुमारे वर्षभरापासून शासनाच्या अनुदानाचा पत्ता नाही. मार्च महिन्याच्या अखेरीला रखडलेले अनुदान मिळण्याची आशा असताना कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लागू झालेल्या टाळेबंदीमुळे तेही लांबणीवर पडले आहे. अशा स्थितीमध्ये अनेक दात्यांचे ‘दातृत्व आणि माणुसकी’मुळे वात्सल्य मंदिरच्या बालकाश्रमातील निराधार मुलांच्या चेहर्‍यावर लॉकडाऊनच्या काळातही हास्य फुललेले आहे. 

वर्षभर अनुदान रखडले

जग काय असते याचे भान येण्यापूर्वीच विविध कारणांमुळे अनेकांच्या आई-वडीलांचे छत्र हरपते. अनेकांच्या पालकांना दुर्धर व्याधींनी ग्रासलेले असते. त्यामुळे घरात आठराविश्‍व दारिद्रय असल्याने पालक असूनही त्या मुलांना अन्य मुलांप्रमाणे हौसेमौजे करता येत नाही. अशा अनाथ मुलांसाठी ओणी येथील वात्सल्य मंदिर सुमारे वीस वर्षाहून अधिक आधारवड बनली आहे. देवरूख येथील मातृमंदिर संस्थेची ओणीची ही शाखा वात्सल्य मंदिरकडे सोपविली आहे.

वात्सल्य मंदिरला सामाजिक संस्थांची मदत

सद्यस्थितीमध्ये येथे असलेल्या पंधरा मुलांचा दैनंदिन खर्च भागविण्यासाठी सहाय्य म्हणून शासनाकडून दिल्या जाणार्‍या अनुदानाचा गेल्या वर्षभरापासून पत्ता नाही. लॉकडाऊनने स्थिती अधिकच बिकटच आहे. अशा स्थितीत समाजातील अनेक दाते, विविध सामाजिक संस्था बालकाश्रमाच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या आहेत. त्यांच्या सढळ हस्तेच्या मदतीतून बालकाश्रमातील मुलांच्या चेहर्‍यावर हास्य फुलले आहे. 

रिक्षा व्यावसायिकांचा हातभार
लॉकडाऊनमुळे रिक्षा व्यवसायिकांवरही उपासमारीचे संकट आहे. परंतु स्वतःच्या दुःखाकडे दुर्लक्ष करीत बालकाश्रमातील मुलांच्या मदतीसाठी त्यांनी हात पुढे केला. या व्यतिरिक्त माय राजापूर, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान, हौशी शरीरसौष्ठव संघटना, खरवते, सौंदळ गावांमधील ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते आदींनी बालकाश्रमाला मदतीचा हात दिला आहे. 

अनेक दात्यांच्या मदतीमुळे बालकश्रमातील मुलांच्या जीवनावश्यक वस्तूंसह दैनंदिन जेवणासाठी लागणार्‍या अन्नधान्याचा प्रश्‍न सुटला आहे. रखडलेले अनुदान शासनाकडून येईल तेव्हा येईल. लॉकडाऊनचा कालावधी वाढला तरी मुलांच्या अन्नधान्याचा प्रश्‍न निर्माण होणार नाही. समाजामध्ये आजही असलेले दातृत्व आणि माणुसकीमुळे हे शक्य झाले आहे.
----डॉ. महेंद्र मोहन गुजर, वात्सल्य मंदिर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com