वटपौर्णिमेच्या सणाला गावातील विज गायब

अमित गवळे 
बुधवार, 27 जून 2018

पाली : सुधागतड तालुक्यातील उद्धर गावातील विज बुधवारी (ता.२७) सकाळ पासून गायब होती. गावातील एक फेज गेल्याने जवळपास ३५ पेक्षा जास्त घरांमध्ये विज नव्हती. त्यामूळे एैन वटपौर्णिमेच्या सनामध्ये लोकांची गैरसोय झाली.

गावात मागील अनेक दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरु आहे. विज दुरुस्त करण्यासाठी गावातील नागरीकांनी पालीतील विज वितरण मंडळाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच गावात काम करणारा विज वितरण मंडळाचा कर्मचारी बाहेर गेला आहे. दुसरे कर्मचारी दुरुस्ती करण्यासाठी नाहीत अशी उत्तरे त्यांच्याकडून मिळाली. त्यामूळे ग्रामस्त संतापले आहेत.

गावात वारंवार विज जाते. विज वितरण महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे येथे पुर्णपणे दुर्लक्ष होते. विज दुरुस्तीसाठी एखादा कर्मचारी उपलब्ध नसल्यास कोणी तरी दुसरा कर्मचारी उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. सणासुदीत व पावसाळ्यात लोकांची खुप गैरसोय होते. 
-तुषार केळकर, ग्रामस्थ,उद्धर
 
Web Title: Vatapournime celebrations disappeared in the village

टॅग्स