सावधान ! वेंगुर्लेत भाजी व्यापारी कोरोना पॉझिटीव्ह 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 20 August 2020

नगराध्यक्ष दिलीप गिरप, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्‍विनी माईणकर, पोलिस निरीक्षक तानाजी मोरे, मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे उपस्थित होते.

वेंगुर्ले ( सिंधुदुर्ग ) - शहरात एक भाजी व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह मिळाला आहे. त्याच्या भावाची स्वॅब टेस्ट घेतली असून त्याचा रिपोर्ट अद्याप प्राप्त झाला नाही. आज सकाळी प्रशासनाकडून भाजी विक्रेते राहत असलेला 50 मिटर परिसर हा कंटेन्मेंट तर बाजूचा 100 मिटरचा परिसर हा बफर झोन जाहीर केला असल्याची माहिती तहसिलदार प्रविण लोकरे यांनी दिली. 

नगराध्यक्ष दिलीप गिरप, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्‍विनी माईणकर, पोलिस निरीक्षक तानाजी मोरे, मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे उपस्थित होते. जिथे भाजीपाला विकत होते ते भाजीपाला मार्केट आज बंद राहणार आहे. तो भाग पालिकेमार्फत निर्जंतुक केला आहे. भाजी विक्रेत्यांची रॅपिड टेस्ट आज होईल.

त्यानंतर उद्यापासून (ता. 21) भाजी मार्केट सुरू करण्याचा निर्णय होईल. उर्वरित बाजारपेठ सुरू राहणार आहे, असे तहसीलदार यांनी जाहीर केले. नागरीकांनी व व्यापाऱ्यांनी घाबरुन जाऊ नये व गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर गर्दी न करता सामाजिक अंतर पाळून व्यवहार सुरु ठेवावेत व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष गिरप यांनी केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vegetable Trader Corona Positive In Vengurle Sindhudurg Marathi News